एक कोल्हा होता. एके
दिवशी तो भक्ष्याच्या शोधात भटकता भटकता एका गावाच्या वेशीजवळ
येऊन पोचला. इतक्यात
कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. कोल्ह्याने कान उभारले
आणि
डोळे विस्फारले. कोल्हा तिथून पळून जाण्याचा विचार करेपर्यंत गावातील कुत्रे
झपाट्याने धावत
येऊन तेथे पोचले. कोल्हा जीव मुठीत घेऊन तिथून पाळला. कोल्हा पुढे
पुढे पळत होता आणि त्याच्या
पाठीमागून कुत्रे भुंकूत धावत होते. पाळता पाळता
कोल्ह्याला समोर जे घर दिसले, त्या घरात तो
घुसला आणि एका मोत्याश्या पिंपात दडी
मारून बसला.
आणखी वाचा : दोन हंस आणि बडबडे कासव, कोल्हा आणि द्राक्षे
Marathi stories for kids
ते घर एका
रंगाऱ्याचे होते. तो कपडे रंगवायचे काम करत असे. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या
पिंपात
वेगवेगळे रंग भरून ठेवले होते. कोल्ह्याच्या मागे लागलेल्या कुत्र्यांना
कोल्हा काही सापडला नाही.
त्यामुळे ते माघारी निघून गेले. कुत्रे निघून गेले
असल्याची खात्री पटल्यावर कोल्हा सावकाश
पिंपातून बाहेर पडला. तो संपूर्णपणे
निळ्या रंगाने माखला गेला होता.
मग तो नीळा कोल्हा
धापा टाकत वनामध्ये परतला. पण वनामधला कोणताही प्राणी त्याला ओळखू
शकला नाही! सर्व
प्राणी त्याच्याकडे विस्मयाने पाहत आणि त्याला घाबरून तेथून पळ काढत. सर्व
प्राणी
असे का वागत आहेत, हे निळ्या कोल्ह्याच्या अगोदर लक्षातच आले नाही. पण वाटेमध्ये
जेव्हा
तो एका सरोवराजवळ पाणी पिण्यासाठी गेला, तेव्हा त्याने पाण्यात आपले
प्रतिबिंब पहिले.
आणखी वाचा : दोन हंस आणि बडबडे कासव, कोल्हा आणि द्राक्षे
“अरेच्या! माझा रंग नीळा कसा काय झाला बुवा! तो आश्चर्यचकित
झाला. त्याच वेळेस एक वाघ
पाणी
पिण्यासाठी येत होता. त्याने दुरूनच निळ्या कोल्ह्याला पहिले आणि तेथूनच पळ
काढला. ते पाहून
कोल्ह्याला गंमत वाटली तो मन उंचावून रुबाबात उभा राहिला. त्या
सरोवरावर पाणी पिण्यासाठी
येणारे सिंह, चित्ता आणि लांडगा हे सर्व प्राणी त्या निळ्या
कोल्ह्याला पाहून घाबरू लागले. हा नवा
प्राणी आला तरी हा नवा प्राणी आला तरी कुठून? असा निळ्या रंगाचा प्राणी ना कधी पाहिला
ना कधी
त्याच्याबद्दल एकले. जर हा प्राणी आपल्यापेक्षा अधिक शक्तिवान असला तर? जर
त्याने आपल्यावर
हल्ला केला तर? असा विचार करून सर्व प्राणी भीतीने तिथून पळ काढू
लागले.... हे पाहून निळ्या
कोल्ह्याच्या मनात एक विचार आला. मग तो एका मोठ्याशा
शिळेवर चढून मोठ्या रुबाबात म्हणाला,आणखी वाचा : दोन हंस आणि बडबडे कासव, कोल्हा आणि द्राक्षे
“हे प्राण्यांनो, तुम्ही पळू नका. मला घाबरू
नका. ब्रम्हदेवाने स्व:तच माझी निर्मिती केली आहे. सर्व प्राण्यांचा राजा
म्हणून
त्याने स्व:ता माझा अभिषेक केला आहे. त्यामुळे मी आजपासून तुमचा राजा आहे. तुम्हा
सर्वांच रक्षण करणं,
हा माझा धर्म आहे.” हे ऐकून सिंह, वाघ, चित्ता इत्यादी सर्व
प्राणी निळ्या कोल्ह्याच्या भोवताली जमा झाले आणि ते
म्हणाले, “महाराज, आज्ञा
करावी...” मग निळ्या कोल्ह्याने मंत्रिमंडळ बनवले. त्याने सिंह, वाघ आणि चित्ता
यांना
मंत्रीपदावर नेमले. लांडग्याला द्वारपाल म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे
नीळा कोल्हा राज्यकारभारात चालवू
लागला. सर्व प्राणी त्याच्याशी आदराने वागू
लागले. त्याच्या आज्ञांचे पालन करू लागले. नीळा कोल्हा चतुर होता.
आता तर तो राजा
झाल्याने इतर कोल्ह्यांबरोबर बोलतही नव्हता. सर्व कोल्ह्यांना त्याने वनातून पळवून
लावले होते.
सिंह-वाघ यांसारखे प्राणीसुद्धा शिकार करून प्रथम ती कोल्हे
महाराजांना अर्पण करत आणि मग उरले सुरले स्व:त
खाऊन समाधान मानत. अशा प्रकारे नीला
कोल्हा आपला राज्यकारभार उत्तमरीत्या सांभाळत होता. दरम्यान एके
रात्री एक आवाज
निळ्या कोल्ह्याच्या कानांवर पडला. त्याने कान टवकारले. खूप दूरवरून कोल्ह्यांच्या
कोल्हेकुइचा
आवाज येत होता. तो आवाज ऐकून नीळा कोल्हा रोमांचित झाला. तो डोळे बंद
करून दुरून येणारी कोल्ह्यांची
कोल्हेकुई एकतानतेने एकू लागला. एकाएकी नीळा कोल्हा
सुद्धा आकाशाच्या दिशेने मान उंचावून जोरजोरात
“कुई-कुई’ असा आवाज करू लागला.
वाघ,सिंह इत्यादी प्राण्यांनी आपल्या राजाचा ‘कुई-कुई’ असा आवाज ऐकला; तेव्हा हा तर कोल्हाच आहे, हे सर्व
प्राण्यांना कळून चुकले. सिंह म्हणाला, “ या निळ्या कोल्हयाने तर आपल्याला आजवर चांगलच मूर्ख
बनवलं. म्हणून आता आपण त्याचा वधच केला
पाहिजे.” नीळा कोल्हा तेथून पळ काढणार इतक्यात सिंहाने
त्याच्यावर झडप घातली आणि
क्षणार्धातच कोल्ह्याचे प्राण निघून गेले. त्यानंतर सर्व प्राण्यांनी मिळून निळ्या
कोल्ह्यावर आरामात ताव मारला.
तुम्हाला निळा कोल्हा ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद...