दोन हंस आणि बडबडे कासव...
एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरामध्ये एक कासव राहत होते. त्या परिसरातील
दोन हंस त्याचे जिवलग मित्र होते. सरोवराच्या किनारी दोन्ही हंस कासवाशी
भरपूर गप्पा गोष्टी करत आणि संध्याकाळी आपापल्या घरी परतत. कासव खूपच
गप्पिष्ट होते. त्याच्या गप्पा एकून हंस खुश होत असत.
अशा प्रकारे ते तिघे एकमेकांचे गाढे मित्र बनले होते. त्यांचे दिवस आनंदात
व्यतीत होत होते. एका वर्षी पावसाळ्यात पाऊस पडलाच नाही. सरोवर हळूहळू
आटू लागले. अखेरीस सारे पाणी आटून गेले. सरोवरात केवळ चिखलच राहिला.
हंस तर उडत उडत कुठल्या तरी दुसऱ्या सरोवरावर जाऊ शकत होते. पण बिचाऱ्या
कासवाने काय करावे? कासवाला दु:खी पाहून हंससुद्धा दु:खी झाले. ते कासवाला
म्हणाले, “अरे मित्रा, सरोवरात आता तर केवळ चिखलच शिल्लक राहिला आहे.
अशा परिस्थितीत तू कसा काय जगू शकशील?” कासव म्हणाले, “पाण्याशिवाय
मी फार काळ जिवंत राहू शकत नाही. यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवा ना....
तुम्हाला तर पाण्याने भरलेली अनेक सरोवरे माहित आहेत. त्यामुळे उडत उडत
तुम्ही तेथे पोचू शकाल....” कासव हे बोलत असताना त्याची नजर थोड्या दूरवर गेली.
तेथे एक छोटीशी डहाळी पडली होती. ती डहाळी पाहताच कासवाला एक कल्पना सुचली.
ते ती डहाळी घेऊन आले आणि म्हणाले, “तुम्ही दोघे या डहाळीचे एकेक टोक आपापल्या
चोचीत घट्ट पकडा. मी डहाळी माझ्या दातांनी मधोमध घट्ट पकडेन. तेव्हा मग तुम्ही
उडायला सुरुवात करा आणि मला पाणी असलेल्या कुठल्यातरी सरोवराजवळ घेऊन जा.”
हंस म्हणाले, “ तुझं म्हणनं आम्हांला मान्य आहे. जसं तू सांगितलंस, तसंच आम्ही करू
आणि तुला घेऊन उडायला लागू.