दानशूर कर्ण

 

                                             कर्णाची उदारता

एकदा भगवान श्रीकृष्ण पांडवाबरोबर बोलत होते. भगवान त्यावेळी कर्णाची सखी त्याच्या उदारतेबद्दल आठवण काढत होते. हि गोष्ट अर्जुनाला आवडली नाही. अर्जुन म्हणाला, “श्यामसुंदर, आमचे मोठे भाऊ धर्मराजापेक्षा उदार तर कोणी नाही. तरी तुम्ही त्याच्या समोर कर्णाची स्तुती का करत आहात?” भगवान म्हणाले, “हि गोष्ट तुला परत कधी समजावून सांगेन. काही दिवसानंतर अर्जुनाला बरोबर घेऊन श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठिराच्या राजमहालावर ब्राह्मणांचा वेश घेऊन पोहचते. त्याने धर्मराजाला सांगितले कि एक मन चंदनाची सुकी लाकडे पाहिजेत. आपण कृपा करून मागवून द्या. त्या दिवशी जोराचा पाऊस पडत होता. कुठूनही लाकडे आणली तरी ती ओलीच होणार. राजा युधिष्ठिराने राज्यात नोकर पाठविले. परंतु योगायोग असा होता कि चंदनाची सुकी लाकडे शेर अर्ध्या शराहून जास्त मिळाली नाही. युधिष्ठीर हात जोडून म्हणाला, “आज सुके चंदनाचे लाकूड मिळत नाही. आपण कोणतीही वस्तू मागाल ती गोष्ट मी घेऊन येईन.” भगवान म्हणाले, “सुके चंदनाचे लाकूड मिळाले नाही तर नाही आम्हाला दुसरे काही नको.” तिथून अर्जुनाबरोबर ब्राम्हणाचा वेश घेऊन भगवान कर्णाच्या घरी गेले. कर्णाने मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले. भगवान म्हणाले, “आम्हाला यावेळी एक मन सुकी चंदनाची लाकडे पाहिजेत. कर्णाने दोघा ब्राम्हणांना असणावर बसवून त्याची पूजा केली. नंतर धनुष्य घेऊन त्याच्यावर बाण लावला. बाण मारून कर्णाने आपल्या सुंदर महालातील मौल्यवान खिडक्या, दारे, पलंग इत्यादी वस्तू तोडून लाकडाचा ढीग रचला. सर्व लाकूड चंदनाचे होते. हे पाहून भगवान म्हणाले, “तू सुक्या लाकडांसाठी या वस्तू का नाहीश्या करतोस?” कर्ण हात जोडून म्हणाला, “यावेळी पाऊस पडत आहे. बाहेरून लाकडे आणायला उशीर होईल. तुम्हाला थांबावे लागेल. या वस्तू तर परत तयार करता येतील परंतु माझ्याकडे आलेला अतिथी जर निराश झाला किंवा त्याला त्यामुळे काही कष्ट पडले तर ते दु:ख माझ्या मनातून जाणार नाही. भागवानांनी कर्णाला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला आणि ते अर्जुनाबरोबर चालू लागले. ते अर्जुनाला म्हणाले, “अर्जुना ! पाहिलेस धर्मराज युधिष्ठिराच्या राजमहालाची दारे, खिडक्या सुद्धा चंदनाच्या लाकडाच्या होत्या. चंदनाच्या दुसऱ्या वस्तुपण राजमहालात होत्या. परंतु चंदनाचे लाकूड मागितल्यावर या वस्तूंकडे धर्मराजाचे लक्ष गेले नाही किंवा त्याला आठवले नाही. परंतु कर्णाने आपल्या मोल्यवान वस्तू तोडून लाकडे दिली. परंतु कर्णाने आपल्या मोल्यवान वस्तू तोडून लाकडे दिली. कारण स्वभावतःच उदार आहे आणि धर्मराज युधिष्ठीर विचारपूर्वक आपल्या धर्माचे आचरण करतात. मी या कारणामुळेच स्तुती करतो. या गोष्टीद्वारे आम्हाला शिकवण मिळते कि परोपकार, उदारता, त्याग किंवा चांगले कार्य करण्याचा स्वभाव बनविला पाहिजे. जे लोक नेहमी चांगले कार्य करत नाही आणि विचार करत राहतात कि मोठी संधी आल्यावर ते महान त्याग किंवा उपकार करतील. ती वेळ आल्यावर त्यांना हि गोष्ट सुचत नाही कि मोठा त्याग कसा करावा. जे लहान त्याग आणि उपकार करण्याचा स्वभाव बनवितात तेच मोठे कार्य करण्यात यशस्वी होतात.

Post a Comment (0)
Previous Post Next Post