सिंड्रेलाची गोष्ट | chan chan goshti | लहान मुलांसाठी छान गोष्ट

     राजकुमारी सिंड्रेला | परि कथा |

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावाची मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या.

तिची सावत्र आई त्या दोन बहीणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खूप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची सफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे काम सिंड्रेलाला करावे लागायचे. तिला कपडे सुद्धा जून पुराणे घालावे लागायचे. सिंड्रेलाची सावत्र आई तिच्या बहिणी मात्र छान नवनवे कपडे दागिने घालून मिरवायच्या आणि मजेत राहायच्या.

आईचे बघून त्या बहिणीसुद्धा सिंड्रेलाला त्रास द्यायच्या. काम करून करून सिंड्रेला नेहमी थकलेली असायची, तिचे कपडे मळलेले असायचे, त्यामुळे बहिणी तिला खूप चिडवायच्या. स्वत:छान तयार होऊन तिला वाकुल्या दाखवायच्या. पण म्हणून सिंड्रेला त्यांच्याशी कधी वाईट वागली नाही.

एक दिवस त्या राज्यातल्या राजकुमाराणे एक अलीशान मेजवानी आयोजित केली. त्या मेजवाणीसाठी राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना आमंत्रित केले गेले. राजकुमार लग्नाचा झाला होता. याच मेजवाणीसाठी आलेल्या एखाद्या मुलीसोबत तो लग्न करणार होता.

सिंड्रेलाच्या सावत्र आईने आपल्या मुलींना छान तयार केले. नवीन कपडे आणि दागिने घातले. राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावले म्हणून आता आपल्याला जायला मिळेल असे सिंड्रेलालाही वाटत होते. त्यामुळे तिला मेजवा-णीला जायची उत्सुकता होती.

सिंड्रेलाला कधी तिच्या आईने कोणाकडेही मेजवानीला नेले नव्हते. तिने राजकुमाराला कधी पहिले नव्हते. पण राजमहाल पाहायला मिळेल, छान जेवण मिळेल, रोजच्या कामाऐवजी थोडा बदल होईल म्हणून ती खुश होती. एरवी तिला घरातले उरलेसुरले शिळे अन्नच खावे लागायचे. सिंड्रेलाने आपल्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांपैकी त्यातल्या त्यात बरे स्वच्छ दिसणारे कापड घातले. तिच्या सावत्र बहीणींचे तिच्याकडे लक्ष गेले. स्व:त तयार होताना त्या मुद्दाम सिंड्रेलाला खिजवायला आईला म्हणाल्या.... “आई, राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावलं म्हणजे सिंड्रेलाला पण मेजवाणीला जाता येईल का?”

आईने तुसडेपण उत्तर दिले. “छे, राजकुमाराणे लग्नासाठी मुली बघायला म्हणून मेजवानी आयोजित केली आहे. तो काही असल्या मळक्या कापडातल्या मोलकरणीशी लग्न करणार आहे का? तिचा हा अवतार पाहून तिला कोणी आतही घेणार नाही. काही गरज नाही सिंड्रेलाला मेजवानीला जायची. सिंड्रेला तू आपल्या कामाकडे लक्ष दे.”

सिंड्रेलाला हे ऐकून खूप वाईट वाटले. तिच्या बहिणी बग्गीत बसून निघून गेल्या. सिंड्रेला घराच्या मागे एका झाडाखाली जाऊन रडत बसली. तिचे रडणे ऐकून एक परी तिथे आली.

तिने सिंड्रेलाची चौकशी केली. तिच्याबद्दल ऐकून परील वाईट वाटले. ती म्हणाली, “रडू नकोस. मी तुला आत्ता छान तयार करून मेजवाणीला पाठवते. “तिने चुटकी वाजवली आणि जादुने सिंड्रेलाचा पोषाखाला अतिशय सुंदर झग्यात बदलून टाकले. तिला हीऱ्यांचे दागिने आणि चमचमणाऱ्या बूट दिले. पुन्हा कुटकी वाजवून तिची केशभूषासुद्धा बदलून टाकली.”

सिंड्रेला अजूनच सुंदर दिसायला लागली. तिला या जादूवर विश्वास बसत नव्हता. पण तिला लगेच प्रश्न पडला. “माझ्या आईने मला सगळी कामे करायला सांगितली आहेत. ती कामे झाली नाहीत आणि तिला मी घरात दिसले नाही तर ती खूप चिडेल.” परि हसली.

तिने पुन्हा चुटकी वाजवली आणि सिंड्रेलाची सगळी कामे झाली. परि तिला म्हणाली “तुझी कामे पण झाली आणि आईची काळजी करू नकोस. ती आता झोपी गेली आहे आणि उद्या सकाळीच उठेल. तू मेजवाणीला जाऊन आल्याचं तिला कळणार पण नाही.” सिंड्रेलाल जरा हलक वाटलं.

पण ती म्हणाली, “आता तर मेजवानी सुरू सुद्धा झाली असेल. इथेच किती उशीर झालाय. मी वेळेत पोहचू शकणार नाही.”

परीने त्यावरही मार्ग काढला. तिने आपल्या जादुने समोरच्या भोपळ्या पासून एक मोठ्ठी बग्गी बनवली. तिथेच पळणाऱ्या दोन उंदरावर जादू करून घोडे बनवले. आणि बग्गी हाकायला एक उंदराला गडीवाण बनवले.

सिंड्रेलाने अतिशय आनंदाने परीचे आभार मानले. परीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि मेजवाणीचा आनंद घ्यायला सांगितले आणि सोबतच एक इशाराही दिला.

“माझी या वस्तूंवरची जादू मध्यरात्री बारा वाजता संपेल आणि पुन्हा सगळ्या वस्तु आणि प्राणी पहिल्यासारखे होतील. त्यामुळे तू खबरदारी घे आणि मध्यरात्री आधी मेजवाणीतून परत घरी ये.”

सिंड्रेलाने होकार दिला आणि ती बग्गीत बसू मेजवानीला गेली. ती तिथे पोहोचल्यावर तिची अलीशान बग्गी, तिचे कपडे आणि दागिने पाहून सर्वांना ती एक राजकुमारीच वाटली. सर्वांचे लक्ष तिच्याकडे होते. राजकुमारानेही तिला पहिले. तिला आपल्या सोबत नृत्य करायला बोलावले.

सिंड्रेलाला राजकुमाराने आपल्याला बोलवल्यामुळे खूप छान वाटले. तिने आनंदाने हसत त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याच्यासोबत छान नृत्य केले. दोघांनी सोबत जेवण केले. आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. तिचे घड्याळाकडे लक्ष होतेच. तिने मध्यरात्र जवळ येताच आपल्याला उशीर होईल असे सांगून राजकुमाराच्या निरोप घेतला आणि पटकन आपल्या बग्गीत बसून घरी आली.

तिच्या बहीणींनीही तिला असे कधी न बघितल्यामुळे मेजवानीतली ती सुंदर मुलगी म्हणजे आपली सिंड्रेलाच हे लक्षात आले नाही. त्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईला त्या मुलीविषयी रंगवून सांगत होत्या, की कसं ती मुलगी आल्यावर राजकुमाराने इतर कोणाकडेही लक्ष दिले नाही. तो कसा फक्त तिच्यासोबत बोलत बसला होता. राजकुमाराने आपल्या मुलींकडे लक्ष दिले नाही म्हणून आई जरा हिरमुसली.

त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत सिंड्रेला आपली रोजची कामे करत होती आणि राजकुमाराचा विचार करत होती. आत्तपर्यंत तिच्याशी कोणी इतकं चांगलं वागलं नव्हतं. त्यामुळे राजकुमार तिला खूप आवडला होता.

तिकडे राजकुमारालाही ती खूप आवडली होती. तो तीचाच विचार करत होता. तिला पुन्हा भेटता यावं म्हणून पुन्हा राजकुमाराने तशीच मेजवानी पाठवले, आणि मध्यरात्री आधी परत येण्याचे सांगितले.

राजकुमार आणि सिंड्रेला एकमेकांना भेटून खूप खुश झाले. खूप आनंदाने त्यांनी नृत्य, जेवण, गप्पा यात वेळ घालवला. आज राजकुमाराशी गप्पा मारण्यात हरवून गेल्यामुळे सिंड्रेलाचे वेळेकडे लक्षच नव्हते. घड्याळाचे ठोके सुरू झाले तेव्हा सिंड्रेलाल एकदम परिचा इशारा आठवला आणि ती तिथून पळाली.

राजकुमाराला काय चाललयं हे कळले नाही. राजकुमाराला तिने असे का केले असावे हा विचार करून दु:ख झाले. पण त्याला कोपऱ्यात तिची एक चमकदार बूट पडलेला दिसला. त्याने त्या बुटाचा वापर करून तिला शोधायचं आणि तिच्याशी लग्न करायचं असं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी त्याने सैनिकांना ती चप्पल देऊन शहरातल्या सगळ्या मुलींकडे जाऊन त्यांना ती चप्पल पायात बरोबर बसते का हे बघायला सांगितले. जिच्या पायात ती चप्पल बसेल आणि जीच्याकडे जोडीची दुसरी चप्पल असेल तीच आपल्याला आवडलेली मुलगी असणार असा राजकुमाराचा विचार होता.

सैनिक सर्व शहरात फिरत फिरत सिंड्रेलाच्या घरी आले. त्यांनी आपले येण्याचे कारण सांगितले. सिंड्रेलाच्या दोन्ही बहिनिंनी ती चप्पल घालून पहिली पण त्यांना ती घालता आली नाही. त्यांनी सिंड्रेलाला काम करताना बघितले आणि तिलाही चप्पल घालून बघायला सांगितले.

तिच्या बहीणींनी विरोध केला. “ही तर मेजवानीला आली पण नव्हती. मग हिची चप्पल कशी तिकडे पडेल?”

पण राजकुमाराच्या सर्वच तरुण मुलींना चप्पल घालून बघण्याचा आदेश असल्यामुळे सैनिकांनी सिंड्रेलाला ती चप्पल दिली. तिला ती बरोबर आली आणि सर्वांना आश्चर्य वाटले. तिने आपल्याकडे असलेली दुसरी चप्पल दाखवली.

राजकुमारापर्यंत ही खबर गेली आणि तो तिला भेटायला आला. तिने सर्वांना आपली हकीकत सांगितली. राजकुमाराने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आनंदाने होकार दिला.

आता सिंड्रेला राजकुमाराशी लग्न करणार आणि उद्या ती राणी होणार हे समजल्यावर सिंड्रेलाची सावत्र आई आणि बहिणी खूप घाबरल्या. त्यांनी सिंड्रेलाची आत्तापर्यंत खूप त्रास दिल्याबद्दल क्षमा मागितली. सिंड्रेलाने मोठया मनाने त्यांना माफ केले.

सिंड्रेला आणि राजकुमारचे धुमधडाक्यात लग्न झाले, आणि त्यांनी एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य घालवले.

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post