नवरा मराठी कविता | Life Partner Kavita |

 || नवरा तो नवराच असतो ||

नवरा तो नवराच असतो

कितीही रागवला तरी

मायेने तोच जवळ घेतो....

कधी रागाने बाहेर गेला

तरी त्याचे पाय आपोआप

घराकडे वळतात....

मनातले भाव त्याला

डोळ्यातूनच कळतात....

किती दु:खी असलातरी,

सार गिळून घेतो

कोण आहे, तिला आपल्या शिवाय

म्हणून एक गजरा घेऊन येतो....

नवरा तो नवराच असतो....!

काळजी का करतेस

मी आहे न तुला म्हणून

किती धीर देतो साऱ्या अडचणी

आपल्या मनात ठेऊन बायकोकडे

हासऱ्या नजरेने पाहतो....!

नवरा तो नवराच असतो....!

जसे घरावर छत असते

तसेच आपल्या डोक्यावर

नवऱ्याचे झाकण असते

किती सुरक्षित असतो

आपण त्यांच्या सावलीत....

उन्हाचे चटके तो खातो पण

सावली आपल्या डोक्यावर देतो....

नवरा तो नवराच असतो....

आपण चार अलंकार घालून म्हणतो

मान माझी मंगळ सूत्र तुझ्या नावाचे

कपाळ माझे बिंदी तुझ्या नावाची

तो कधी म्हणतो का...?

कष्ट माझे पगार तुझे...

शरीर माझे आयुष्य तुझे...

जन्म आईच्या उदरात

पडलो तुझ्या पदरात....

तूच जीवन सांगिनी म्हणून

गोड मानत असतो....

शेवटी नवरा तो नवराच असतो....

संसाराचा रथ दोन

चाकांवर चालतो

त्यासाठी दोघांनाही समतोल

सांभाळावा लागतो....

एक चाक डगमगल तर

एका चाकावर रथ हाकणे

फार अवघड होते...

बायको शिवाय घराला

घरपण नाही

तसचं नवऱ्या शिवाय

बायको पूर्ण नाही

तो कळस आहे घराचा

छत आहे परिवाराचा....

चटके तो खातो

आपण मात्र सावलीत राहतो....

खरंच नवरा तो नवराच असतो....

   

Post a Comment (0)
Previous Post Next Post