छत्रपती शिवाजी महाराज भाषण
आता दिवा पाहिजे..
महाराष्ट्राला पुन्हा एकदा,
जिजाऊंचा शिवबा पाहिजे....
🙏🙏
सन्माननिय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. प्रथम सर्वांना
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई होते.
शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि तल्लक बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता. म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.
स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, कोंडाजी फर्जद अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली.
शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजलखान, औरंगजेब, शाहीस्तेखान अशा अनेक शत्रूला त्यांनी हरवून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली.
एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणिले. 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला विश्वास दिला.
जाणता शिवाजी राजा माझा,
एकच असा होऊन गेला...
इतिहासाच्या पानांमध्ये,
नाव आपले कोरून गेला....
जय शिवाजी.... जय भवानी...
🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय... 🙏🙏