क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले.
सावित्रीबाईंचा जन्म ३जानेवारी१८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते.
अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला.
त्या काळी मुलींना शिक्षणाची परवानगी नसल्यामुळे सावित्रीबाई अशिक्षित होत्या. परंतु लग्न झाल्यावर ज्योतिरावांनी त्यांना लिहायला, वाचायला शिकवले.स्त्रियांना ही शिक्षणाचा हक्क मिळावा असे ज्योती रावांना वाटायचे म्हणूनच त्यांनी आधी सावित्रीबाईंपासून शिकवायला सुरवात केली.
इ.स.१८४८ मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मिळून पुण्यातील भिडे वाड्यात मुलीनं साठी पहिली शाळा सुरू केली.
या शाळेत पहिल्या शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळाला.
स्त्रीशिक्षण विरोधी समाजात शिक्षिका म्हणून काम करताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जसे की शाळेत जाता-येता रोज रस्तावर लोक त्यांच्या अंगावर चिखल, शेण,दगड मारत. शिव्या देत. तरी पण सावित्रीबाईनी शाळेत शिकवायला जाणे थांबवले नाही. मग काही नालायकांनी तर जीवे मारण्याची ही धमकी दिली. त्यांनी अश्या धमक्यांना आणि त्रासाला भीक घातली नाही. आणि त्यांचे शिक्षणाचे कार्य चालूच राहिले.
सावित्रीबाई शिक्षिकेसोबत कवयित्री आणि समाज सेविका पण होत्या. काव्यफुले, बावनकशी रत्नाकर अश्या काव्य संग्रहातून त्यांनी समाजप्रबोधन केले.
सतीप्रथा, बालविवाह, केशवपन अशा वाईट प्रथांना विरोध केला. विधवांचे पुनर्विवाह व्हावेत यासाठीही त्यांनी कार्य केले. विधवा,अनाथ मुले, गोरगरिबांनसाठी अनाथ आश्रम काढले.
इ.स.१८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथ आली. त्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईना प्लेग झाला आणि१०मार्च१८९७ रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.
"किती भोगले किती सोसले, तरी तिने शिकवले.
स्त्री शिक्षणाचे धडे पुढे, तिच्या लेकींनी गिरवले."
सावित्रीबाईंच्या लेकी म्हणून घ्यायला अभिमान वाटतो. कारण मुलींनी शिकून सक्षम व्हावे हे स्वप्न जरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाहिले असेल पण ते पूर्णत्वाला सावित्रीबाईनी नेले.
त्या काळात ज्योती रावांना सावित्रीबाईंनी साथ लाभली म्हणून आजची स्त्री उच्च शिक्षित आहे. हे कायम लक्षात ठेवावे लागेल.