एखाद्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत नाही ती व्यक्ती आपल्या आठवणीत कायम राहते.तीच व्यक्ती आपण स्वप्नात पुन्हा पुन्हा पाहतो.कधी त्या व्यक्तीचा विचार न करता अचानक त्या व्यक्तीची आठवण विनाकारण सतावत राहते ती अचानक स्वप्नातही दिसते.या पद्धतीचे आपण काहीही अनुभवत असाल तर नक्कीच यामागे काही मानसशास्त्रीय करणे आहेत आणि त्या कारणांमुळेच आपण सतत त्या एकाच व्यक्तीचा विचार करत असतो.झोपायच्या आधी आणि झोपून उठल्यानंतर तुमच्या मनात त्याच व्यक्तीचा विचार सतत असेल तर यामागे ठोस अशी काहीतरी कारण आहेत
आणि या लेखात तोच सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे, की ती व्यक्ती कोण आहे आणि ती व्यक्तीच आपल्या स्वप्नात आणि आठवणीत कायम का असते.तिचा आणि आपला असा काय संबंध आहे की आपण तिला विसरू शकत नाही किंवा आपल्या आठवणीतून ती बाजूला जाऊ शकत नाही.
तुम्ही अशा कुठल्याही स्थितीत आहात का ? या स्थितीमध्ये तुमच्या मनावर फक्त एका आणि एकाच व्यक्तीचा प्रभाव आहे.त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मनातून काढू शकत नाही त्याची आठवण सतत तुम्हाला सतावत असते.तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही ती व्यक्ती तुमच्या आठवणीतून जाण्याचा नावच घेत नाही.बहुतांश लोकांना असा अनुभव आला असेल कारण हा खूप सामान्य अनुभव आहे पण यामागे काही गहन संकेत असतात.आणि या संकेतामुळेच आपल्याला आपण अनुभवत असलेला या सर्व गोष्टींचा अभ्यास करता येईल की आपण का त्या व्यक्तीचा विचार सोडू शकत नाही आणि तीच ती व्यक्ती आपल्या मनावर सारखा परिणाम करते.सर्वात पहिले आपण विचार करणार आहोत की आपले मन कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीशी भावनात्मक दृष्टीने जोडले जाते.आणि हे संकेत आपल्याला हेही सांगतात आपण त्या व्यक्तीचा विचार करतो ते आपला भावनांशी जोडलेले आहेत.आपण त्या व्यक्तीशी भावनात्मक जोडले गेलेलो आहोत आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्याला मनशांती कशी मिळेल हे ही आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
संकेतानुसार आपल्या आयुष्यात येणार एखादी व्यक्ती आपल्याशी भावनात्मक दृष्ट्या आणि वैचारिक दृष्ट्या खूप खोलवर जोडली जाते.आणि त्या व्यक्तीचा हे जोडलं जाण फक्त त्याच्याशी बोलणं किंवा भेटणे यावर अवलंबून राहत नाही , एक असा धागा निर्माण होतो ,एक असं बंधन तयार होतं की आपण त्याला समजू शकत नाहीआणि ते निर्माण झालेले बंधन आहे तेच आपल्याला त्या व्यक्तीबद्दल अतिशय खोलवर विचार करण्यास किंवा त्याच्याकडे आकर्षित करत असतं.आणि अशा प्रकारचा लगाव निर्माण होतो ,तेव्हा त्या व्यक्तीला न भेटताही आपण त्याच्याजवळ आहात अशा भावना निर्माण होतात त्याचे सगळे विचार आणि त्यांच्याबद्दल असलेल्या भावना आपल्या मनात घोळत राहतात आपण त्या व्यक्तीपासून दूर नाही या भावना निर्माण होतात.त्या व्यक्तीचे अस्तित्व असणे म्हणजे त्याच्या विचारांचा आणि त्यांच्या भावनांचा अस्तित्व असते.जेव्हा हे तुम्ही त्यांच्याशी बोलता किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधतात तेव्हा तुम्हाला असे जाणवायला लागते की या व्यक्तीशी आपला भावनिक नाते आहे. आणि हे नाते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही.ती व्यक्ती तुमच्यासाठी एखादं नाव किंवा एखादा चेहरा राहत नाही ते तुमच्यासाठी एक भावना असते. त्यामध्ये बद्दल विचार करणे हे तुम्हाला सुखद अनुभव ही देत किंवा अस्वस्थ ही करत. आणि हाच लगाव त्या व्यक्तीला तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे सिद्ध करून देतो.आणि हे जे नातं आहे ते देखाव्या पुरतं नसून तुमच्या हृदयातून असतं आपण ह्याला म्हणू शकतो आत्म्याचे नातं.यावरूनच असं लक्षात येते एखादी व्यक्ती जर आपण या विचारांशी भावनांशी एवढी जवळील साधत असेल तर ती आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळच स्थान निर्माण करते.आणि यानंतर त्या व्यक्तीची सतत आठवण सतावत राहणे ही स्वाभाविक गोष्ट आहे.
दुसऱ्या संकेत असा असतो की आपल्या जीवनातील काही असे मौल्यवान क्षण असतात असे आपल्या मनात नेहमीसाठी घर करून राहतात.असू शकतो की ,त्या व्यक्तीसोबत तुम्ही असे काही क्षण घालवले असतील की त्या क्षणांची तुमच्या मनावर एक छाप राहिलेली असेल. हे क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा हसणं ,त्या व्यक्तीचं समाधान किंवा तिच्यासोबत घालवलेले काही अप्रतिम क्षण ही असू शकतात.आणि हेच ते क्षण असतात जे आपल्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करतात आणि आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत राहतात,त्या फक्त आठवणी राहत नाहीत त्या तुमच्या भावनांचा एक भाग बनतात.ती व्यक्ती तुमच्यासाठी हाडामासाची व्यक्ती न राहता एक भावना एक संवेदना होऊन जाते.ते क्षण जगताना तुम्ही एक विशेष प्रकारचे नाते अनुभवले होते.आणि ते क्षण आठवून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी राहून गेल्याची खंत तुम्हाला वाटत राहते.आणि आज त्याच कारणाने त्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सतत सतावत राहते कारण तुमच्या भावना त्या व्यक्तीच्या त्या क्षणांशी जोडल्या गेल्या असतात. तिसरा संकेत असे सांगतो की त्या व्यक्तीकडून तुम्हाला काही अपेक्षा होत्या आणि त्या जर पूर्ण झाल्या नाही तर त्या पूर्ण करण्याच्या इच्छेने तुम्ही त्या व्यक्तीला सतत आठवत राहतात ती व्यक्ती सतत तुमच्या आठवणीत राहते आणि ती अधुरी राहिलेली इच्छा जर आपण सोबत असलो असतो तर ,पूर्ण करू शकलो असतो या विचाराने तुम्ही त्या व्यक्तीचा सतत विचार करत राहता,हेच अधुर राहणं तुम्हाला बेचैन करतं आणि त्या व्यक्तीचीआठवण करून देत राहत.ही मनाची स्थिती त्या व्यक्तीचं तुमच्या मनातील स्थान अधिक मजबूत करत राहतं.जर आणखी थोडा वेळ असता तर आपण त्या व्यक्ती सोबत आपल्या मनातील आणखी भावना व्यक्त करू शकलो असतो अशा पद्धतीचे विचार आपल्याला त्या व्यक्तीच्या आणखी जवळ घेऊन जातात शरीराने नव्हे पण मनाने आपण त्या व्यक्तीच्या आणखीन खोलवर जवळ जात असतो आणि या दुराव्यामुळेच आपण त्या व्यक्तीच्या भावनिकदृष्ट्या आणखीनच जवळ जाऊन पोहोचतो.
चौथा संकेत काही विशेष दर्शवतो एखाद्या व्यक्ती बद्दल खूप खोलवरचं प्रेम किंवा आकर्षण तुम्हाला त्या व्यक्तीशी मानसिक दृष्ट्या जोडते .जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खऱ्या मनातून प्रेम करत असाल तर आपोआप तुम्ही त्या व्यक्तीशी भावनात्मक दृष्ट्या जोडल्या जातात. हे आकर्षण फक्त शारीरिक नसून तुमच्या मनातील भावना एकमेकांशी जोडल्या जात असतात.आणि हा एक असा अनुभव असतो की तो तुम्हाला मनात खोलवर जाणवत असतो संभावना असते की तुम्ही जे अनुभवत आहात ते समोरची व्यक्ती ही अनुभवत असते.कधी कधी हे विचार आपल्याला त्रास देवू शकतात. तो व्यक्ती तुमच्याजवळ नसते,ती तुमच्या जवळ नसूनही तुम्ही तिच्यासाठी एवढ्या खोलवर विचार करून तिच्याशी जोडले गेलेले आहात यावरून असे लक्षात येते की तुमचे त्या व्यक्तीवरचे प्रेम खरे आणि सखोल आहे.