सत्यवादी राजा हरिश्चंद्र | पौराणिक कथा

                              सत्यवादी राजा हरिश्चंद्र  

सत्यवादी राजा हरिश्चंद्र
हरिश्चंद्र राजा हा गुरु वासिष्ठांचा शिष्य . त्यांची हीच ओळख कथेला रंग देते. जैमनि ऋषि पक्षीरुपातली द्विजश्रेष्ठ म्हणाले, 'मला हरिश्चंद्राच्या कथेबद्दल अत्यंत कुतूहल आहे. त्याने अनेक कष्ट सोसले, परंतु त्यास स्वर्गप्राप्ती तरी झाली का? कृपया ते मला सांगावे.' यावर पक्षी म्हणाले, विश्वामित्रांचे बोलणे एकूण राजा आपल्या पत्नी व मुलाला घेऊन पदयात्रा करीत वाराणसी नगरीत गेला.' तेथे हरिश्चंद्रासमोर विश्वामित्र हजर झाले. विश्वामित्रांना पाहून राजा हरिश्चंद्र म्हणाला, 'आता आम्ही फक्त तिघे राहिलो आहोत, आमच्यापैकी आपणाला कोणी अर्घ्यस्वरूप पाहिजे असेल तर मी तयार आहे.' राजाला चिंतायुक्त झालेले पाहून तारामती राणी म्हणाली,  'महाराज! आपण सात अश्वमेध यज्ञ करून राजसुज्ञ यज्ञाचे पुण्य मिळवले आहे. आता एवढ्याशा कारणांसाठी सर्वांचा नाश करू नका, नाहीतर आपण स्वर्गापासून वंचित होऊ.' पक्षीरूप द्विज सांगू लागले की, राणीचे हे कथन एकूण राजा अत्यंत शोकामुळे  मूर्च्छित झाला. परंतु विश्वामित्रांनी राजाच्या मुखावर पाण्याचे सिंचन करताच राजा शुद्धीवर आला. त्याला विश्वामित्र म्हणाले, 'दक्षिणा देण्यास अजून काही काळ शिल्लक आहे, तोपर्यंत तू दान जमव.' हे बोलणे ऐकल्यावर राणी तारामती  राजास म्हणाली, 'हे राजन, आपण मला दासी म्हणून विकून टाका व त्यांची दक्षिणा चुकती करा.' तेव्हा राजा म्हणाला, 'ठीक आहे, हे निंदनीय कार्य देखील करावयास आता मी तयार आहे. त्यानंतर राजा नगरात गेला व मोठ्याने ओरडू लागला की, 'मी निर्दयी पापात्मा आहे, कारण माझ्या पत्नीस विकावयास तयार होऊनही मी अजून जीवंत आहे, माझ्या या प्रिय पत्नीस जर कोणी दासी म्हणून खरेदी करण्यास तयार असेल तर सांगावे.' तेवढ्यात एक वृद्ध म्हणाला की, मला दासीची आवश्यकता आहे. कितीही मूल्य देवून, मी हिला खरेदी करू इच्छितो'. हे ऐकून दु:खग्रस्त राजाने शोक केला. परंतु त्या वृद्धाने त्याच्या वास्रात भरपूर धनराशी ठेवली व तो तारामती राणीस घेऊन जाऊ लागला. आपल्या आईस जातांना पाहून तिचा पुत्र रोहीताश्व तिच्या मागून आई! आई!! असे म्हणत ओरडत पळू लागला. यावेळी आईचे हृदय स्वस्थ बसेना, ती वृद्धास म्हणाली, 'कृपा करून आपण या मुलाससुद्धा खरेदी करा. हा माझ्याशिवाय जगू शकणार नाही'. म्हणून वृद्धाने आणखी काही द्रव्य राजास देवू केले व त्या दोघांना घेऊन गेला. पत्नी व मुलाच्या वीरहाने राजा शोकाकुल झाला. वृद्ध मात्र त्या दोघांना घेऊन आपल्या राजवाड्यात आला. त्याचवेळी विश्वामित्र राजा हरिश्चंद्राजवळ पुन्हा हजर झाले. राजाने आपल्या जवळचे धन त्यांना दान केले. परंतु विश्वमित्राचे समाधान झाले नाही. ते राजास म्हणाले, 'आता दिवसाचा फक्त चौथा प्रहरच शिल्लक राहील आहे. तोपर्यंत दान मिळविण्यासाठी मी प्रतीक्षा करीन.' राजाने विचार करून मग स्वत:ला विकायचे ठरवले व म्हणू लागला, 'कोणाला दास खरेदी करण्याची इच्छा असेल त्याने मला घेऊन जावे'. तेव्हा धर्म चांडाळाचे रूप घेऊन तेथे उपस्थित झाला. राजाला जेव्हा कळले की हा चांडाळ आहे, तेव्हा राजाने त्यास विरोध केला. त्याचवेळेस विश्वामित्र तेथे येऊन म्हणाले की,  'राजा तो तुला अधिक दान देत आहे, मग तू माझी दक्षिणा का देत नाहीस'. राजा म्हणाला, 'मी सूर्यवंशी आहे, याचे दस्यत्व कसे पत्करू?" अखेरीस विश्वामित्रांच्या आग्रहामुळे राजाने त्याचे दस्यत्व स्वीकारले. राजा आता आपल्या पत्नीच्या व पुत्राच्या स्थितीविषयी विचार करू लागला. राज्यनाश, पत्नी-पुत्राचा विरह त्यांचा विक्रय अशी एकामागून एक दु:खेच मला प्राप्त होत आहे, असे राजास वाटू लागले. त्यानंतर चांडालाने राजास स्मशानामध्ये नेऊन त्याच्यावर मृत व्यक्तींची वस्रे नेण्याच काम सोपविले. चांडाल राजास म्हणाला, 'दिवसभरात आलेल्या मृतातम्या कडून जे धन प्राप्त होईल, त्यातील सहावा भाग हा तुझ्या पगार असेल.' राजा हरिश्चंद्र मग स्मशानात गेला. तेथे त्याला अनेक प्रकारचे विलापयुक्त  आर्तस्वर ऐकू येत होते. राजा विचार करू लागला की, माझ्या राज्यातील माझे नोकर-चाकर, मंत्री माझी सत्ता असलेले माझे राज्य कोठे गेले? विश्वामित्राच्या क्रोधामुळे माझे सर्वस्व लुटले गेले आहे. दिवसभराच्या कामाने थकून झोपी गेलेल्या राजाने स्वप्नात पहिले की, अन्य देह धारण करून त्याने गुरुदक्षिणा दिली आहे व बार वर्षे दु:खे भोगल्यावर त्याला मुक्ती मिळाली 

Post a Comment (0)
Previous Post Next Post