मराठी सुंदर विनोद
मराठी सुंदर विनोद जे तुम्हाला खळखळून हसवतील.
डॉक्टर - (रुग्णाला) हे औषध घ्या आणि दोन चमचे सकाळी, दोन चमचे दुपारी आणि
दोन चमचे रात्री घ्या.
रुग्ण - डॉक्टर साहेब, माझ्यावर दया करा मी एक गरीब माणूस आहे.
माझ्याकडे औषध घ्यायला एवढे चमचे नाहीत.
सोनाजी - असं म्हणतात की दिवसा पाहिलेलं स्वप्न खरं होत नाही.
पण मी काल दिवसा पाहिलेल स्वप्न खरं झालं.
विवेक - सोनाजी ते कसं?
सोनाजी - काल दुपारी मी वर्गात झोपेत स्वप्न पहिलं,
की सर मला मारत आहेत. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा
सर खरोखरच मला मार पडत होता.
एकदा एक धोबी आपल्या गाढवाला घेऊन जनावरांच्या डॉक्टरांकडे गेला.
डॉक्टर जेव्हा गाढवाजवळ गेले, तेव्हा गाढव त्याला चाटायला लागले.
डॉक्टर म्हणाले, "ही काय फालतुगिरी चालली आहे?"
धोबी बोलला, वाईट वाटून घेऊ नका.
"डॉक्टर! आपला मुलगा समजून ते तुम्हाला चाटत असेल."
वकील - "तू चोरी केली आहेस हे सिद्ध होते.
कारण प्रत्येक वस्तूवर तुझ्या हाताचे ठसे उमटले आहेत."
अपराधी - " हे कसं शक्य आहे वकील साहेब? चोरी
करताना तर मी हातमोजे वापरले होते!"
रजनी - जेव्हा आमच्या घरात भांडणे होतात, तेव्हा दोन्ही
पोरांना मी घराबाहेरच पाठवते.
उगाच त्यांच्यावर वाईट संस्कार नकोत.
उषा - म्हणूनच दिवसभर तुझी मुलं घराबाहेर दिसतात.
मामा - बेटा, तुझे बाबा आत काय रे करताहेत?
बंड्या - तुम्ही कधी जात आहात त्याचीच वाट बघताहेत.
तुम्ही गेलात की ते बाहेर येतील.
महेश - नीरजला अजून ताप आहे का?
नीरज - ताप गेला पण कंबर अजून दुखतेय.
महेश - घाबरू नको कंबर देखील लवकर जाईल.
लग्नाची पंगत जेवायला बसली. पंगतीत नावाजलेला खादाड बंडू सुद्धा होता.
त्याने बुंदीचे 99 लाडू खाल्ले, तेव्हा लाडू वाढणाऱ्याने बंडूला आग्रह केला. "आणखी एक लाडू खा,
म्हणजे आपले शतक पूर्ण करा".
छे ! छे ! भलतच काय सांगता?
शंभर लाडू खायला मी काय राक्षस आहे?
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवऱ्याबरोबर भांडतांना, काय उदगार काढतील....?
पायलटची बायको.... "गेलास उडत ..."
मंत्राची बायको... "पुरे झाली तुमची आश्वासनं"
शिक्षकाची बायको.... "मला शिकवू नका..."
रंगकाम करणाऱ्याची बायको... "थोबाड रंगवीण..."
धोब्याची बायको... "चांगली धुलाई करीन..."
सुताराची बायको... "ठोकून सरळ करीन.."
तेल विक्रेत्याची बायको... "गेलात तेल लावत..."
नाव्याची बायको... "केसाने गळा कापलात की हो माझा..."
डेंटिस्टची बायको... "दात तोडून हातात देईन..."
शिंप्याची बायको... "शिवलसं तर याद राख..."
अभिनेत्याची बायको... "कशाला नाटकं करता?"
वाण्याची बायको... "नसत्या पुड्या सोडू नका..."
राजेशच्या गाडीला महमार्गावर भीषण अपघात झाला होता. दैव बलत्तर म्हणून शेजारच्या गावातील लोकांनी
त्याला जवळच्या दवाखान्यात दाखल केले आणि त्याचे प्राण वाचवले. शुद्धीवर आल्यानंतर राजेशने
प्रचंड आरडा-ओरडा सुरू केली. "डॉक्टर ! डॉक्टर ! असे तो किंचाळू लागला. त्याचा गोंधळ ऐकून
डॉक्टर धावत आले. काही दुखतंय का तुमचं, असे त्यांनी राजेशला विचारले. त्यावर राजेश म्हणाला,
"डॉक्टर, अहो माझे पाय कुठे गेले? मला माझ्या पायांची जाणीवच होत नाहीये."
त्यावर डॉक्टर म्हणाले, " छे ! छे ! असं कसं शक्य आहे?
मी तुमचे हात कापलेत, पाय नाही."
बाहेर गावी गेलेले तेली अण्णा हॉटेल मध्ये जेवणासाठी जातात. तेथील लेडी वेटरला बोलावून ते ऑर्डर देतात.
"जा माझ्यासाठी जळक्या पोळ्या, खारट वरण, तिखट भाजी व कच्चा भात घेऊन ये.
आणि मी जेवत असताना माझ्यासमोर बसून कटकट कर.
मला आज घरची खूप आठवण येते आहे.