मकर संक्रांतीसाठी \ लग्नासाठी अतिशय सुंदर उखाणे
⦁ दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस .... रावांचे नाव घेते हळदीकुंकवाचा दिवस.
⦁ निसर्ग निर्मिती च्या वेळी सूर्यनारायण झाले माळी ....रावांच नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी.
⦁ सोन्याचे मंगळसूत्र त्याला शंभर मोती ....राव माझे पति मी त्यांची सौभाग्यवती.
⦁ गर्दरेशमी साडीला भरजरीची काठ .... रावांचे नाव घेऊन बांधते भाऊ भावजयची गाठ.
⦁ तिळगूळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा ....रावांचे प्रेम लाख रुपये तोळा.
⦁ कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास .....रावांना भरवते श्रीखंडाचा घास.
⦁ विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट ...... रावांचे नाव घेऊन सोडते भाऊ भावजयची गाठ.
⦁ पुरणपोळी वर वाढतात भरपूर तूप....राव मला आवडतात खूप.
⦁ पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा .... राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा.
⦁ सागराला आली भरती , नदीला आला पुर .... रावांच्या प्राप्तीसाठी आई-बाप केले दूर.
⦁ रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा ...... रावांचे नाव घेते, मिळो आशीर्वाद तुमचा.
⦁ कुबेरच्या भांड्यात हीरे माणकांच्या राशी ..... रावांचे चरण , हेच माझी अयोध्या - काशी.
⦁ परिजातकाचे फूल म्हणजे सात्विक सौंदर्याचे प्रतीक, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले .. .. .. सारखे पती.
⦁ सर्वांच्या आग्रहानंतर उखाणा आठवते ...... रावांचे नाव घेताना मीच मोहरते.
⦁ नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा ..... रावांच्या संसारी अपना सर्वांची शुभेच्छा.
⦁ बालपण गेले माता-पिताच्या पंखाखाली, तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ, संसारच्या वळणावर
मिळाला..... रावांचा प्रेमळ हात.
⦁ पतीव्रतेचा धर्म नम्रतेने वागते ..... रावांचे घेऊन आशीर्वाद मागते.
⦁ रामाने राज्य दिले, भरताने नाकारले .. .. रावांच्या जीवासाठी सौभाग्य स्वीकारले.
⦁ लावित होते कुंकू ,त्यात सापडला मोती .... रावां सारखे पती मिळाले भाग्य मानू किती.
⦁ जन्म दिला मातेने , पालन केले पित्याने .... रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
⦁ सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी .... रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
⦁ सासरचे निरंजन, माहेरची फुलवात .... रावांचे नाव घेण्यास आजच केली सुरुवात.
⦁ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी .... रावांचे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.
⦁ हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे ..... रावांचे नाव घेते, सत्यनारायणा पुढे.
⦁ संसाराच्या देव्हाऱ्यात उजाळतो नंदादीप समाधानाचा ..... रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड
सौभाग्याचा.
⦁ शंकरांचा सोमवार, गणपतीची चतुर्थी, माझ्या हृदयात कोरली ..... रावांची मूर्ती.
⦁ वसंतऋतूचे आगमन हाच वसुंधरेचा शृंगार .... रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा अलंकार.
⦁ गरम गरम भात, भाजला माझा हात .... रावांच नाव घेते मिनिटांच्या आत.
⦁ उंबरठयावरल माप पदस्पर्शाने लवंडते .....रावांची पत्नी म्हणून गृहप्रवेश करते.
⦁ ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ...... रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
⦁ संसाररूपी करंडा मनोरउपी झाकण ....रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण.
⦁ अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस .....रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.
⦁ सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला .....रावांचे नाव घेतांना आनंद होतो मनाला.
⦁ गहू तांदळाने भरले सूप .....रावांचा स्वभाव भारी आहे खूप.
⦁ घातले मंगळसूत्र, लावले कुंकू आणि नेसली साडी, लोक म्हणतात, शोभून दिसते माझी नि .....रावांची जोडी.
⦁ हिरवीगार झाडं, नदीच्या काठी ..... रावांच नाव घेते खास तुमच्या साठी.
⦁ कपाळी लावली, टिकली चंद्रकोर .....रावांसारखे पति मिळाले, नशीब माझं थोर.
⦁ आईसारखी माया जगात नसते कुणाला, ....रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणाला.
⦁ विद्या शोभते बुद्धीने ,लक्ष्मी शोभते धनाने .....रावांसोबत जीवन जगते मनाने.
⦁ मंदिरात वाहते फूल आणि पान ..... रावांच नाव घेते ठेवून सर्वांचा मान.
⦁ आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा ....रावांच नाव घेते आयुष्यभर सहवास लाभवा.
⦁ नाजुक अनारसे साजूक तुपात तळावे .....रावांसारखे पति मला जन्मोजन्मी मिळावे.
⦁ नाव घ्या, नाव घ्या म्हणून करू नका गजर .....रावांच नाव घ्यायला मी नेहमीच असते हजर.
⦁ पावसाच्या स्पर्शाने दारवळतो मातीतला सुगंध ....रावांसोबत जुळले साता जन्माचे ऋणाणुबंध.
⦁ गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी ....रावांचे नाव घेण्याची नेहमी मिळो संधी.
⦁ मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर .... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
⦁ जुईची वेणी ,जाईचा गजरा आमच्या दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.
⦁ लक्ष्य दिव्यांसारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम .....रावांची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
⦁ हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी .... रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
⦁ बसायला चंदनाचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, खायला मोत्याचा घास ...रावांच नाव घेते तुमच्या साठी खास.
⦁ श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झालं दंग....रावांच्या प्रेमामुळे चढला माझ्या मेहंदीला गडद लाल रंग.
⦁ माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू ....रावांच्या प्रेमळ संसारात ओठांवर असत नेहमी हसू.
⦁ जिजाऊ सारखी माता, शिवाजी सारखा पुत्र ....रावांच्या नावाने घालते मी मंगळसूत्र.
⦁ हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार....रावांसोबत मी वयाची शंभरी गाठणार.
⦁ मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार....रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार.
⦁ सासुसासऱ्यांच्या छायेत मला नाही काही कमी .....राव हेच माझ्या सर्वस्वाचे स्वामी.
⦁ नव्या नव्या शालूचा, पदर सांभाळतांना मन माझे भांबावते .... रावांच्या साथीने नवजीवनाचे स्वप्न मी रंगवते.
⦁ पर्वतीने पुत्रासाठी केला महादेवाला नवस ..... रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस .
⦁ जाई जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती ....रावांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती.
⦁ राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती साक्षात ....रावांच नाव घेते नीट ठेवा लक्षात.
⦁ काळ्या साडीला चांदण्याचा साज ....रावांच नाव घेते संक्रांत आहे आज.
⦁ तिळगूळ घ्या गोडगोड बोला ....रावांशी लग्न झाले लग्नाला वर्ष झाले सोळा.
⦁ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ ....रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगूळ.
⦁ पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेच पान , खायला छान, आंबा त्याच्या केल्या फोडी, आई बाबांची
गोडी, समोर होती तुळशीची बाग, तिथे होती सीता, सीताजवळ होती कळशी, त्यात होत गंगेच पानी,
आणि..... रावांच बोलण म्हणजे अमृतवाणी.