मकर संक्रांती 2025 संपूर्ण माहिती.
मकरसंक्रांती हा भारतातील एक प्रमुख सण आहे. दरवर्षी हा सण 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी साजराकेला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकरसंक्रांती नंतर दिवस मोठा तर रात्र लहान होते. मकर
संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते. या दिवशी विविध भाज्यांची एकत्रित भाजी बनवली जाते. तिल लावून
बाजरीची भाकरी ही केली जाते. घरातील सर्वजण भाजरीची भाकरी व भाजी आवडीने खातात. त्यांनंतर मकर
संक्रांतीच्या दिवशी पुराण पोळीचा स्वयंपाक केला जातो. सर्वजण एकमेकांना 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, असे
म्हणत तिळगूळ वाटतात. विवाहित महिला या दिवशी हळदी - कुंकू समारंभ घेतात. महिला एकमेकींना वाण
देतात. या दिवशी लोक पतंग उडवण्याचाही आनंद घेतात. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिकांत साजरी केली
जाते. हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही ह्या वस्तु परिधान करू नयेत.
तर मैत्रिणींनो 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण आहे तर कुठल्या वस्तु परिधान करू नये चला
बघूया तर मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कुठलेही वस्त्र परिधान करू नये. पिवळी साडी असो व पिवळे
कुठलेही कपडे असो परिधान करायचे नाही. तसेच पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत. कुठल्याही
रंगाच्या बांगड्या घातल्या तरी चालेल पण पिवळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये तसेच देवीने मोती परिधान
केलेले आहे तर मोत्याचा हार किंवा मोत्याच्या बांगड्या मोत्याच्या कोणत्याही वस्तु आपण घालायच्या नाही.
केसराचा तिळा देवीत केसराचा टिळा लावून आला असल्यामुळे आपल्याला केसराचा तिळा स्वत:ही लावायचा
नाही आणि आपल्या बाळाला किंवा कोणालाही लावू द्यायचा नाहीत. ह्या वस्तु मकर संक्रांतीला परिधान करू
नये.
मकर संक्रांतीला सकाळी सूर्यदेवाचे पूजन करावे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल
अर्पण करायचे आहे. म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये घ्यायचे आहे.
त्यामध्ये थोड कुंकू, तीळ आणि लाल फूल टाकायचे आहे. हे पानी सूर्याला अर्पण करायचे आहे. हे पानी अर्पण
करताना आपण "ॐ सूर्याय नम:" किंवा "ॐ आदित्य नम:" या प्रकारे मंत्राचा जप करायचा आहे. आशा प्रकारे
जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवची विशेष पूजा करायची आहे. यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची
प्राप्ती होते, उत्तम तेज प्राप्त होते. सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत.त्यामुळे शक्य असल्यास दररोज सूर्याला
अर्घ्य द्या व "ॐ सूर्याय नम:" हा मंत्र म्हणा. नमस्कार करा. त्याचे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. तसेच, या दिवशी
पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्वाचे मानले जाते.या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे.
कारण यामुळे पुण्याची प्राप्ती होते.
आता पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे वर्ज करायची आहेत. या काळात घरात कुठलेही वादविवाद
करायचे नाहीत, कोणालाही उलट- सुलट बोलायचे नाही. शिव्या - श्राप द्यायचे नाही. सगळेजण मिळून आनंदाने हा
सण साजरा करायचा आहे. सर्वांना तिळगूळ द्यायचे. तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं या सणाला म्हणतात.
त्यामुळे तिळगूळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. संक्रांतीला तिळगूळ का देतात, ते म्हणजे तीळ
आणि गूळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक उष्णता मिळते. तिळगूळ यासाठी उपयुक्त
ठरतो. याच कारणामुळे संक्रांतीला तिळगूळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. संक्रांतीच्या काळात वृक्ष तोडणे,
गवत कापणे वर्ज करायचे आहेत. तसेच म्हशीचे दूध, गाईचे दूध काढणे हे सुद्धा वर्ज आहे.
मकर संक्रांतीचे सुगड पूजन करावे.
मकर संक्रातीला हे नियम आवर्जून पाळावे.