सिंह आणि हुशार ससा | छान छान गोष्टी

                                सिंह आणि हुशार ससा
ससा आणि सिंह
एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी एकत्रित राहत होते. परंतु त्या जंगलात

 राजा आणि सिंह दिसेल त्या प्राण्याला ठार मारीत असे व आपली भूक भागवत असे.

 त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी सिंहाला अतिशय घाबरत असत.
जंगलातील प्राणी
एकदा सर्व प्राण्यांनी सभा भरवली व ठरवले की आपण असे घाबरत जगण्यापेक्षा रोज

 एकेका प्राण्यांनी सिंहाकडे जावे. त्या दिवसापासून दररोज एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ

 लागला. सिंहाला घरबसल्या शिकार मिळू लागल्यामुळे तोही खुश झाला. एकदा एका

 सशाची सिंहाकडे जाण्याची पाळी आली. हा ससा खूप हुशार होता.  त्याला एक युक्ति

 सुचली, तो मुद्दामच थोडा उशिरा सिंहाकडे गेला. एकडे सिंह भुकेणे कासावीस झाला होता.

 ससा येताच त्यांनी उशिरा येण्याचे कारण विचारले. सशाने त्याला सांगितले की वेटेत एक

 विहिरीजवळ मला तुमच्या पेक्षाही बलाढ्य सिंह भेटला होता. त्यांनी मला रस्त्यात रोखले व

 म्हणाला की माझ्यापेक्षा बलाढ्य सिंह कोणीच नाही. हे ऐकून सिंहाने विचारले, "असं, कुठे

 आहे सिंह मला दाखव." सशाने सिंहाला विहिरीजवळ आणले व म्हणाला "तो  सिंह या

 विहरीत लपून बसला आहे. सिंहाला विहरीत स्वत:चे प्रतिबिंब दिसले.
हुशार ससा
त्याला  वाटले दूसरा सिंह तो हाच. त्याने मोठ्याने गर्जना केली. त्याला विहरितून आवाज

 आला, त्याला वाटले की दूसरा सिंहाने गर्जन केली. सिंहाने रागाने विहरीत उडी मारली.

 आशा प्रकारे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ससा अतिशय खुश झाला आणि तेथून

    निघून गेला. जंगलातील सर्व प्राणी आनंदाने जंगलात राहू लागले. 

                          तात्पर्य : शक्ती  पेक्षा  युक्ती  श्रेष्ठ 


Post a Comment (0)
Previous Post Next Post