आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावी उपाय

                                         

                       ||श्री स्वामी समर्थ ||


  आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावी उपाय

1.    दररोज सकाळ व संध्याकाळी देवासामोर तेलाचा दिवा लावावा.     

2.    आपल्या जन्मदिवशी तिखट मीठ न वापरता आळणी जेवण करावे.                       

3.    सूर्योदयापूर्वी घरासमोर सडा रांगोळी करावे.  

4.    मोर पीस घरातील दक्षिण दिशेस भिंतीवर लावले असता कुणाचे ऋण येणे असेल तर परत मिळेल.

5.    एखाद्या गुरुवारी अचानक धनलाभ झाला असल्यास त्यातील १,२,५,१० रुपयाची नोट एका कागदाच्या पाकिटात ठेवून ते पाकीट देवघरात व्यवस्थित एक ते दिड महिना ठेवल्यास अचानक धनलाभ होईल.

6.    घराबाहेर जाताना आपल्या खिशात काही पैसे ठेवावे. तरच पैसे मिळत असतात.

7.    मंगळवारी हातापायाची नखे काढून एका पुडीत बांधून दाराच्या बाहेर फेकून द्यावी. उसने दिलेले पैसे परत येतात.

8.    आपल्या घरासमोर जनावरासाठी एक हौद पाणी पिण्यासाठी बांधावा त्यातील पाणी कधी खंड पडू नये तीन वर्षाने भाग्य बदलते.

9.    कुलधर्म, कुलाचार, श्राद्ध, पक्ष, व्रत, उपवास आपल्या रूढी प्रमाणे करावे. पुर्व जनित दोष जातात.

10. श्री हनुमान यांच्या फोटोला रोज किंवा शनिवारी केवड्याच अत्तर लावावे. धनलाभ होईल.  

11. गुरुपुष्यामृत योगावर सोनाराच्या दुकानातून एक चांदीचे निरंजन सूर्योदयापूर्वी घरी आणावे. रोज एक एक  अशी वाढवत १२ दिवसापर्यंत व  १२ व्या दिवसापासून एक एक कमी करत अशी देवासमोर सूर्योदयापूर्वी लावावी. एक ते दिड महिन्यात एखादी मोठी रक्कम घरी चालत येते.

12.  मधल्या बोटात अंगठी घालू नये. व्यवसायात मोठी नुकसान होईल.

  आपण नेहमी देवाचं नामस्मरण कराव. यामुळे प्रगती होत राहती. धन्यवाद.... 

Post a Comment (0)
Previous Post Next Post