खसखस वडी
साहित्य : एक वाटी खसखस, चार वाट्या दुध, तीन वाट्या साखर, पाव वाटी
पिठीसाखर दोन टी स्पून साजूक तूप
कृती : खसखस धुऊन भिजत घालावी. चाळणीवर ओतून निथळत ठेवावी व वाटून घ्यावी, वाटीभर दुध घेऊन वाटलेली खसखस शिजत ठेवावी. त्यात साखर घालावी व तूप घालून हे मिश्रण चांगले चिकट होईपर्यंत ठेवावे नंतर पातेले खाली उतरवावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून दहा मिनिटे घोटावे. ताटाला तेलाचा हात लाऊन, त्यावर मिश्रण थापावे. तुम्ही पिस्ता, बदाम बारीक काप टाकू शकता. कोमट असतानाच वड्या कापाव्या म्हणजे चुरा होत नाही. ह्या वड्या बाळंतिणीला खूप पौष्टीक असतात.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद...