कोबीची खमंग वडी...

 

                             कोबीची खमंग वडी...

खमंग आणि खुशखुशीत वडी 

                        नेहमीच्या साहित्यात बनवा चविष्ट व खमंग नाष्टा 

साहित्य : पाव किलो कोबी, एक वाटी हरभरा डाळ, दोन टी स्पून डाळीचे पीठ, तिखट, मीठ, धने

 जिरे पावडर, एक बारीक चमचा खाण्याचा सोडा, तळण्याकरिता तेल.

कृती : हरभरा डाळ ४ \५ तास भिजून वाटून घ्यावी. कोबी बारीक चिरून घ्यावा. वाटलेल्या डाळीत

 सर्व साहित्य, कोबी, डाळीचे पीठ, सोडा घालून पिठाचा गोळा करावा. ह्या पिठाचे चार लांबट उंडे

 करावे. चाळणीला तेल लावावे. त्यात मध्ये अंतर ठेऊन उंडे ठेवावेत व उकडून घ्यावेत. गार झाल्यावर

 सुरीने वड्या कापाव्या आणि तळाव्यात. चौकोनी वड्या हव्या असतील तर ताटलीवर थापून, पसरून

 उकडून घ्याव्यात. नंतर चोकोनी वड्या कापाव्यात. कोथींबीरीच्या वड्याही वरीलप्रमाणे करता येतात.

     रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद...

Post a Comment (0)
Previous Post Next Post