पाटवडी
साहित्य : एक वाटी बेसन पीठ, दिड वाटी आंबट ताक, पाव वाटी
तेल, सुके किसलेले खोबरे, एक मोठा चमचा खसखस, २/३ वाटलेली मिरची, हळद, मीठ.
कृती : बेसन पीठात आंबट ताक, वाटलेली मिरची, चवीनुसार मीठ हे सर्व घालून हळद घालावी. पाव वाटी तेलाची (जिरे टाकून) फोडणी करावी. त्यात
कालवलेले पीठ घालावे व अर्धा चमचा तिखट घालावे. पीठ शिजत आले की,घोटून दोन वाफा येऊ
द्याव्या आणि गॅस बंद करावा. ताटाला तेलाचा हात लावून त्यावर हे पीठाचे मिश्रण थापावे. त्यावर खोबरे, बारीक चिरलेली कोथंबीर, खसखस पसरून घालावी. सुरीने
चौकोनी वड्या कापाव्यात. एक चमचा तीळही घालावे.