झटपट गाजराच्या वड्या

 

            झटपट गाजराच्या वड्या


 

साहित्य : दोन वाट्या भरून गाजराचा कीस, एक वाटीभर ओले खोबरे, तीन वाट्या  

            साखर एक वाटी दुध किंवा १०० ग्रँम खवा, दोन चमचे पिठीसाखर, इलायची. 

                

कृती :  गाजरे किसून घ्यावीत. मधला दांडा कधीही घेऊ नये. गाजर कीस, नारळ, दुध किंवा

         खवा, साखर सर्व एकत्र करून जाड बुडाचे पतेलात घालून, गॅसवर ठेऊन ढवळावे. खाली             लागू नये म्हणून घ्यावी. मिश्रण आटून गोळा तयार होऊ लागला की खाली उतरवावे.               त्यात दोन चमचे पिठीसाखर घालून घोटावे. नंतर ताटाला तूप लाऊन त्यावर मिश्रण थापावे.           गार झाल्यावर वड्या कापाव्यात. गाजरे लाल नसतील तर एक थेंब खाण्याचा रंग घालावा.           अशा प्रकारे गाजराच्या वड्या तयार व चवीला ही खूप स्वादिष्ठ लागतात. 

         तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्कीच कमेंट करा. धन्यवाद....

 

 


Post a Comment (0)
Previous Post Next Post