संत गोरा कुंभार
तेरेढोकी गावात गोरा
कुंभार नावाचा एक महान हरीभक्त राहत होता. तो अहोरात्र हरिभजनात मग्न असे. एके
दिवशी त्याची पत्नी पाणी आण्यासाठी नदीवर गेली होती. त्या वेळे त्यांचे मुल अंगणात
खेळत होते. गोराकुंभार अंगणामध्ये मडकी बनविण्यासाठी लागणारी माती तुडवीत होता.
त्यावेळी तो विठ्ठलचिंतनात इतका तल्लीन होऊन गेला कि त्याचे तान्हे बालक रांगत
रांगत कधी त्या चिखलात गेले आणि कधी त्याच्या पायाखाली तुडविले जाऊन मृत पावले, हे
त्याचे त्यालाही कळले नाही. त्याची पत्नी पाणी घेऊन परतली आणि आपले मुल कोठे दिसत
नाही, म्हणून कावरी बावरी झाली. तिने नवऱ्याला ‘आपले बाळ कोठे आहे?’ असे विचारले
तर तो विठ्ठलनामात दंग! अचानक तिचे लक्ष चिखलाकडे गेले.ते पाहून तिने हंबरडा फोडला
आणि “हे तुम्ही काय केलेत? आपल्याच बाळाला चिखलात तुडविलेत? आता मी काय करू? त्या
वेळी तिचे ओरडणे एकूण गोरोबा किंचित देहभानावर आला. आपला मुलगा मेला आहे हे त्याला
माहीतच नव्हते. आपल्या पत्नीने पांडुरंगाच्या ध्यानात विघ्न आणले म्हणून तो
संतापला आणि मडकी फिरविण्याचे चाक उचलून तिला मारण्यासाठी धावला, तेव्हा भयभीत
झालेली त्याची पत्नी सर्व अवसान एकटवून म्हणाली, “माझ्या अंगाला हातबोट जरी लावलेस
तर खबरदार! तुम्हाला विठोबाची शपथ आहे.” ते एकूण गोरोबा गप्पच बसला आणि पुन्हा
नामस्मरणात दंग झाला. त्या वेळी लोक आपली निंदा करीत आहेत, आपला पुत्र आपल्याकडूनच
मारला गेला आहे, याचे भान त्याला नव्हते.
त्यानंतर मात्र विठोबाची शपथ घातल्याने त्याने आपल्या पत्नीला स्पर्श केला नाही. काही दिवस अबोला धरल्यानंतर त्याच्या पत्नींनी त्यांना सजवण्याचा खूप प्रयत्न केला. ती म्हणाली, “प्रपंचात भांडणतंटा होणारच?” मला क्षमा करा. एवढा हट्ट धरून कसे चालेल. त्यावर गोरोबा म्हणाला, “मी विठोबाची शपथ मोडणार नाही.” ते एकून ती म्हणाली ‘यांनी माझा त्याग केला आहे. एक पुत्र होता तोही नियतीने नेला. आता काय करावे म्हणजे यांचा वंश वाढेल?’ तिच्या मनात विचार सुरु झाले आणि तिला उपाय सापडला. एके दिवशी ती आपल्या माहेरी गेली. घडलेला सर्व प्रकार आपल्या मात्यापित्यांना सांगितला आणि आपल्या धाकट्या बहिणीचा विवाह गोरोबाशी करून द्या अशी विनंती केली. पुढे एका शुभहुर्तावर तो विवाह संपन्न झाला. गोरोबाचा सासरा त्याला म्हणाला, “माझ्या मुली तुमच्या पदरी बांधल्या आहेत, तेव्हा दोघींनाही सारखे वागवा तुम्हाला विठोबाची शपथ आहे.” झाले! घरी परतल्यावर तोच शब्द खरा मानुन तो लुगडी, चोळ्या, दागिने,या वस्तू दोघींनाही सारख्या देऊ लागला. पण नव्या पत्नीला स्पर्श करेना. त्यामुळे मोठीने धाकटीला धीर दिला. ती म्हणाली, आपण आज रात्रीच त्याच्या मनात काय आहे ते पाहू.” गोरोबा गाढ झोपेत असताना दोघींनी त्याचा एकेक हात आपल्या अंगावर ठेवला. जाग येताच आपल्या हातांनी पांडुरंगाची शपथ मोडली. या विचाराने तो संतापला व एक तलवार खांबाला बांधून आपले दोन्ही हातच तोडून टाकले. सकाळपर्यंत तो विठ्ठलभजनात मग्न होता. दोन्ही बायकांना धक्काच बसला ‘आता आपले कसे होणार,’ विचार करू लागल्या. त्यावर गोरोबा म्हणाले ‘पांडुरंग काळजी घेईल’ तुम्ही चिंता करू नका. पुढे आषाढीच्या दिवशी दोन्ही पत्नीसोबत तो पंढरपुरास गेला. चंद्रभागेत स्नान केल्यावर पुंडलिकाचे दर्शन घेऊन तो पांडुरंगाच्या मंदिराकडे निघाला. तेथे नामदेवाचे कीर्तन चालले होते, संतजन व भक्त मंडळी हात उंचावून टाळ्या वाजवीत विठ्ठलनामाचा गजर करीत होते. ते पाहून आपल्याला टाळ्या वाजविता येत नाहीत म्हणून गोरोबास वाईट वाटले. त्याने विठ्ठलाचा धावा केला. तर काय चमत्कारच!
पांडुरंगाने स्वत:तेथे प्रगट होऊन त्याचे हात पूर्ववत केलेते. ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्यावेळी गोरोबाची पहिल्या पत्नीने ‘आपले बाळ द्यावे’ अशी विनवणी केली. पांडुरंगाने तिचीही इच्छा पूर्ण केली. त्यावेळी रुख्मिणीने गोरोबाला तो शपथमुक्त झाल्याचे सांगून दोन्ही पत्नीबरोबर नीट संसार करण्याची आज्ञा केली. संत गोरा कुंभार यांची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व तुमच्या मित्र मैत्रीणीना शेअर करा.