उष्णता वाढतेय काळजी घ्या.
शरीरातील पाणी वाढवा. उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागते. म्हणून काळजी
घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरु होतील. उष्णतेचे विकार कमी करण्यासाठी
सोपे उपाय हे तुम्ही घरच्या घरी
करू शकता.
उपाय:
· नियमित प्राणायम करा. उष्णतेचा त्रास कधीच होणार नाही. तसेच दररोज प्राणायम
केल्याने कोणताही आजार आपल्याला होत नाही.
· अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थिर
राहील व उष्णता कमी होण्यास मदत होईल.
· उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी
आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
· उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी अपोआप जास्त वेळ चालू
राहील.
· आपल्या जेवणात नेहमी हलकाच आहार घ्याव व पोट साफ ठेवा. पित्त होईल असे पदार्थ
कमी प्रमाणात खावे.
· माठातील थंड पाणी किंवा कोमट पाणी बसून सावकाश
थोडे थोडे प्यावे.
· उन्हाळ्यात आपण पाणी पिण्यासाठी बर्फाचा वापर जास्त प्रमाणात करतो. पण बर्फ गरम
असल्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे पाण्यात बर्फ वापरू नाही.
· तुम्ही उष्णता कमी करण्यासाठी आवळा, कोकम, लिंबू, मठ्ठा, ताक इत्यादी सरबत प्यावे.
· सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. तसेच कोमट पाणी
पिल्याने पोटाची चरबी, पित्त असे बरेच आजार बरे होतात.
· जेवण करतांना मध्ये मध्ये १/२ वेळा पाणी प्यावे. जेवणात गरम पदार्थ कमी प्रमाणात
असावे. दुपारच्या जेवणात पांढरा कांदा जरूर खावा.
· उन्हातून आल्यावर गुळ पाणी प्यावे किंवा खडीसाखर सोबत ठेवून थोडी थोडी खावे.
खडीसाखर थंड असते.
· १ ग्लास ताकात १ चमचा जिरेपूड, १ चमचा खडीसाखर रोज
पिणे. उष्णता वाढणार नाही.
· रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळावे.तसेच गाईचे तूप नाकात लावणे.
उष्णतेमुळे नाकातून रक्त येणे बंद होते.
· उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कॅप, छत्री, गॉगल यांचा वापर करा आणि
उन्हाळ्यात तब्येत सांभाळा.
धन्यवाद....