शूरवीर शिवरायांचे मावळे थोडक्यात माहिती
शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केलेल्या युद्धात अनेक मोहरे कामी आले. बाजी पालसकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, हिरोजी फर्जंद, प्रतापराव गुजर,मुरारबाजी यासारखे अनेक मोहरे होते त्यांनी स्वराज्यासाठी व आपल्या महाराजांसाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान केले. या महान वीरांच्या मृत्यूने महाराजांना अपार दु:ख झाले. या वीरांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याची महाराजांनी जबाबदारी उचलली."धन्य ते शिवाजी धन्य त्यांचे मावळे" |
राजगुरू दादोजी कोंडदेव आणि बालशिवाजी |
कान्होजी जेधे : कान्होजी जेधे हे कारी येथील वतनदार होते. शहाजीराजांनी पुढे रणदुल्लाखानकडून जेधे यांना आपल्याकडे मागून घेतले व आपल्याबरोबर कर्नाटकात नेले. शहाजीराजांना जुलै १६४८ मध्ये अटक झाली त्या वेळी कान्होजी जेधे व त्यांचा कारभारी दादाजी कृष्ण लोहकरे यांनाही अटक झाली.
कान्होजी जेधे |
नेताजी पालकर : नेताजी पालकर सुरुवातीपासूनच स्वराज्याच्या पायाभरणीस होता. नेताजी पालकरने जवळ-जवळ प्रत्येक लढाईत भाग घेतलेला आहे. नेताजीला प्रती शिवाजी म्हंटले जाते ते उगीच नाही. पन्हाळगडाचा वेढा तोडण्यासाठी सिद्दी हिलाल व नेताजी पालकर चालून आले; परंतु विजापूरकरांच्या प्रचंड सेनेपुढे त्यांचे काही चालले नाही. मुघलांच्या वतीने विजापूरकरांच्या विरुद्ध लढत असताना पन्हाळगड महाराजांना जिंकता आला नाही.
प्रती शिवाजी नेताजी पालकर |
हंबीरराव मोहिते : हंबीरराव मोहिते यांचे संपूर्ण नाव आनंदराव मकाजी मोहिते असे होते. हंबीरराव हा महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांचा भाऊ व प्रतापराव गुजर यांचा मित्र होता.
सरसेनापती हंबीरराव मोहिते |
कोंडाजी फर्जंद : कोंडाजी फर्जंद नाव घेतले की पन्हाळगड डोळ्यासमोर उभा राहतो. अफजलखानाच्या वधानंतर आठ दिवसात पन्हाळा स्वराज्यात आला होता; परंतु सिद्दी जोहारच्या वेढ्याच्या वेळी झालेल्या तहात पन्हाळा विजापुरकरांना परत द्यावा लागला. महाराजांची इच्छा होती पन्हाळा स्वराज्यात असावा. त्यावेळी अगदी लाख मोलाचा माणूस त्यांनी उचलला..कोंडाजी फर्जंद!
वीर कोंडाजी फर्जंद |
बाजीप्रभू देशपांडे : पन्हाळगडावरून विशाळगडावर येताना महाराजांचा पाठलाग करणाऱ्या सिद्धी जौहारच्या सैन्याला महाराज गडावर पोहचेपर्यंत घोडखिंडीत स्वत:च्या हिमतीवर थोपवून धरणारा आणि महाराज गडावर पोहचल्याची तोफांची सलामी एकूण प्राण सोडणारा बाजी प्रभू देशपांडे.
लाख मेले तरी चालतील परंतु, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे |
बाजीप्रभूंचा संसार मोठा होता. त्यांचा एकुलता एक मुलगा बाबाजी प्रभू चांगला जनता कर्तबगार होता. महाराजांनी त्याला सरनौबतीच्या जमेनिशीचा दरख सांगितला. बाजीच्या कुटुंबीयांस महाराजांनी उघडे पडू दिले नाही. त्यांचे सांत्वन केले.
तानाजी मालुसरे : रात्रीच्या वेळेस कोंढाणा किल्ल्यावर निवडक मावळ्यांसह जाऊन गडाचा किल्लेदार उदयभान राठोड यास तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानाला बसला! उदयभानाचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला! स्वत:च्या मरत्या क्षणी राखून ठेवलेला शेवटचा घाव त्याने वैऱ्यावर घातला. सिंहगडावर भगवा झेंडा चढला, तानाजीचे बलिदान अमर झाले.
तान्हाजी मालुसरे |
शिवा काशिद : शिवा काशिद महाराजांच्या सैन्यात शिपाई गडी होता. त्याचेही नाव शिवाजी होते, तो महाराजांसारखा दिसायचा. पान्हाळगडावरून खाली उतरताना महाराजांना पुढे पाठवून स्वत:मात्र हुबेहूब शिवाजी बनून शिवाजी महाराजांना पुढे निघून जाण्यास अवधी मिळाला. सिद्दी मसूदच्या तावडीतून निसटण्यास मदत झाली. नव्या महाराजांची (शिवा काशीद) नवी पालखी सरळ नेहमीच्या मार्गाने आणि शिवाजी महाराजांची पालखी मावळ्यांच्या टोळीसह आडरानात घुसली. सिद्दी जोहारच्या हेरांनी शिवाजी पळाल्याची बातमी छावणीत सांगितली.
वीर शिवा काशिद |
प्रतापराव गुजर : भावना उद्रेकाने बेभान होऊन अवघ्या सात विरांसह त्याने कोल्हापूरजवळ नेसरीच्या खिंडीत खानावर तुटून पडला.
सेनापती प्रतापराव गुजर |
पण १४ फेब्रुवारी १६७४ शिवाजी महाराजांचा एक निधड्या छातीचा सेनापती पडला. प्रतापराव गुजर यांच्या मुलीला महाराजांनी सून म्हणून स्वीकार केला.
मुरारबाजी देशपांडे : पुरंदरगडाची माची घेतल्यानंतर दिलेरखान बालेकिल्ल्याच्या सर दरवाजावर चढाई करण्याच्या तयारीत होता. तेव्हा मुरारबाजीने ७०० निवडक मावले घेऊन दिलेरखानाच्या पाच हजार पठाण सैनिकांवर हाल्ला चढविला.दिलेरखानावर घाव घालणार एवढ्यात दिलेरखानाच्या बाणाने शिर धडावेगळे झाले. मुरारबाजी पडला. मुरारबाजीच्या जाण्याने महाराजांना अपार दु:ख झाले.
स्वराज्यनिर्मिती साठी अनेक मोहरे कामी आले तर काही आजीवन स्वराज्याच्या दरबारात स्वामिनिष्ठ सेवा करीत राहिले. अशा रीतीने महाराजांनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी तरतूद केली व शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहिले.रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज |