सौदर्य भाग-1
प्रत्येकाला वाटत आपण सुंदर दिसावे पण सगळ्यांनाच ब्युटीपार्लर चा खर्च आणि महागडे सौदर्य प्रसाधने परवडतात असे नाही. म्हणून काही घरगुती टिप्स त्वचेसाठी
स्वस्त आणि मस्त
1) दोन चमचे बेसन,अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस, आणि दुधाची साय .फक्त दुध असले तरी चालेल. ह्या सगळ्याचे मिश्रण बनवून चेहऱ्यावर लावा. थोडया वेळाने चोळून चोळून काढा. ह्या मूळे त्वचा मऊ होऊन उजळ दिसते.
2) एक चमचा मध, एक चमचा हळद, एक चमचा कॉफी पावडर, व्हिटॅमिन E ची कॅप्सूल, दोन चिमूट तुरटी पावडर, गुलाब जल आणि बॉडी लोशन हे सगळं मिक्स करा.त्वचेवर लावा.पंधरा मिनिटानंतर धुवून टाका. पहिल्या दिवसापासूनच त्वचेत फरक दिसतो. जास्त प्रमाणात बनवून तुम्ही हे मिश्रण फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.
आठवड्यातून दोनदा तरी हा उपाय करा.
माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद..