Hair Care tips in Marathi | केसांची निगा टिप्स

  सौंदर्य भाग-2

आपण मागील भागात त्वचेविषयीचे उपाय बघितले, आता पाहू केसांसाठीचे उपाय. कारण सुंदर दिसण्यात केसांचाही खुप मोठा सहभाग असतो.काळे,लांब, दाट, सुंदर केस सगळ्यांनाच आवडतात. मेहंदी केसांसाठी खूपच गुणकारी औषधी वनस्पती आहे.मेहंदी नेहमी लोखंडी कढईत भिजवावी. 

मेहंदी भिजवताना पहिले एक चमचा चहा पावडर आणि जास्वानंदाची  चार ते पाच फुले चांगली उकळून घ्या नंतर कढईत एक चमचा आवळा पावडर आणि मेहंदी घ्या त्यात उकळून कोमट केलेले पाणी थोडे थोडे टाकून मेहंदी भिजवून घ्या. नंतर दहा ते बारा तासांसाठी मेहंदी कढईत च झाकून ठेवा.

केस शॅम्पू ने चांगले धुवून मगच मेहंदी लावा .मेहंदी लावण्या आधी त्यात अंड किंवा दही मिक्स करा .हे कंडिशनरच काम करतात.

मेहंदी लावून झाल्यावर एखाद्या पॊलिथिन बॅग वापरून केस कव्हर करा म्हणजे केस वाळणार नाहीत. 


तीन तासांनी केस थंड (कोमट)पाण्याने धुऊन काढा.
गरम पाणी घेऊ नका.    

केस कोरडे झाल्यावर खोबऱ्याचे तेल लावून रात्रभर राहू द्या.दुसऱ्या दिवशी शॅम्पू ने केस धुवा केसांमध्ये फरक लगेच जाणवेल.

अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट्स मध्ये लिहा. धन्यवाद.

Post a Comment (0)
Previous Post Next Post