खिचडी आयुष्याची

 खिचडी

हो...हो...खिचडीच, पुलाव नाही, बिर्याणी  नाही, खिचडीच.

खिचडी म्हंटल की एकदम सात्विक आहार.

पण आपण जरा तिखट खिचडी विषयी बोलतोय. ज्यात तेल, लसूण, अद्रक, जिरे, मोहरी, हळद, मीठ, चटणी, शेंगदाणे, डाळ, बटाटे, टोमॅटो आणि मुख्य म्हणजे तांदूळ असतात. 

खिचडी शिजवून ताटात वाढली कि त्यावर पडते ते तूप.आम्ही लहान असतांना खिचडी बरोबर ताटाच्या मधोमध वाढून घ्यायची आणि मग त्यावर तुप टाकायचे. ते तुप पूर्ण वितळून ताटाच्या कडांपर्यंत येत नाही,तोपर्यंत वाट बघायची. ह्याला म्हणतात धैर्य.

आता म्हणताल खिचडीत धैर्य कोठून आलं.तर आपण बोलतोय आयुष्यावर.

तेल म्हणजे आपण. अद्रक, लसुण, जिरे, मोहरी आणि डाळ म्हणजे आपले आई-वडील, आजी-आजोबा हे जन्माला येतात मिळणारे आपले नाते. मग त्यात भाऊ-बहीण , आत्या, काका, मामा, मावशी हे पण सगळे आले. तिखट - हळद म्हणजे मित्र रंग आणि चव. शेंगदाणे, भाज्या म्हणजे असे व्यक्ती. असले तरी ठीक नसले तरी जास्त काही फरक पडत नाही. 

तांदूळ म्हणजे समाज. आपण स्वतः ठरवतो कि आपल्याला समाजात कसे रहायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी मीठ.

मीठ म्हणजे आयुष्यातील ती व्यक्ती ज्याच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात ही व्यक्ती वेग वेगळी असू शकते. उदा.आई, वडील, शिक्षक इतर. खिचडी शिजवायला लागते ते पाणी. पाणी म्हणजे आयुष्यातील चांगले-वाईट प्रसंग ज्या व्यक्तीला आयुष्याच्या पूर्णत्वाकडे नेतात. एक विचारशील व्यक्ती बनवतात. मग शेवटी येते तुप. तुप म्हणजे म्हातारपण ह्या वयात सगळी आर्थिक आणि घरातील सत्ता ही मुलांकडे व सुनांकडे गेलेली असते. मग जगायच असत धैर्याने. आकांड तांडव न करता.

"तेव्हा पूर्ण होते खिचडी आयुष्याची".👍

Post a Comment (0)
Previous Post Next Post