इंडिया
भारताचे इंडिया हे इंग्रजी नाव इंडस (सिंधू) या शब्दावरून आले
आहे. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून युरोपमधील ग्रीक लोकांमध्ये यासारखीच
नावे प्रचलित होत होती. ग्रीक लोक सिंधू नदीला इंडस म्हणत आणि त्यांनी
या भूमीला इंडिके म्हटले. लॅटिन भाषेत ते इंडिया झाले. याची प्रतिष्ठा ऐकून
अलेक्झांडरने ख्रिस्तपूर्व सुमारे ३०० वर्षपूर्वी आक्रमण केले होते. ग्रीक राजदूत
मॅगस्थेनिसने भारतातील परिस्थिती, सभ्यता आणि संस्कृती यावर इंडिका
नावाचा ग्रंथ लिहिला.
INDIA
इंडिया हे नाव ९व्या शतकापासून जुन्या
इंग्रजीमध्ये आणि १७व्याशतकापासून आधुनिक इंग्रजीमध्ये आढळते.
१९व्या शतकात इंडिया हा शब्द
खूप वेगाने आणखी वापरला जाऊ लागला.