हिंदुस्थान
हिंदू हा शब्द इसवी सनपूर्व ५व्या शतकापूर्वी अस्तित्वात
आल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात. हिंदुस्थान हा शब्द इसवी सनाच्या
पहिल्या शतकात वापरण्यात आला. हिंदू आणि हिंद हे दोन शब्द इंडो-आर्यन/
संस्कृत शब्द सिंधूपासून विकसित झाले आहेत, म्हणजे सिंधू नदी किंवा
तिच्या सभोवतालचे क्षेत्र. प्राचीन इराणचा एकेमेनिड सम्राट डॅरीयस पहिला
याने इ.स.पूर्व ५१६ मध्ये सिंधू प्रदेशावर आक्रमण केले आणि त्याच्या
काळात सिंधूच्या खालच्या खोऱ्यासाठी ‘हिंदू’ हा शब्द वापरला गेला.
तिरंगा |
· अशोकचक्राला भारतात
‘धर्मचक्र’ मानले जाते. ते मौर्य सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व
तिसऱ्या शतकात बांधलेल्या
सारनाथ मंदिरातून घेतले आहे.