ह्या गोष्टींचे करा पालन नक्कीच घरात शांतता आणि समृद्धी येईल

 


II श्री स्वामी समर्थ II

१) घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एका नंतर एकेक असे ७ कापुर जाळावे कापुर जळत असताना श्री स्वामी समर्थ असा जप करावा नारळाचा प्रसाद घरात खावा ( नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा) दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा.

२) आपली घरातील वास्तू १ सेकंदाला ३६ वेळा तथास्तु बोलते घरात नेहमी सकारात्मक बोलावे. नकारात्मक कधी कोणीही बोलू नये. कारण आपल्या घरात जी वास्तू आहे ती नेहमी तथास्तु बोलत असते.

३) ज्या घरात आई, बहीण, पत्नी, मुलगी यांचा अपमान होत असेल तर त्या घरात दरिद्रता येते. ज्या घरात नेहमी कटकट किंवा भांडणे होत असेल त्या घरात पण दरिद्रता येते.

४) घरात दरिद्रता येऊ नये म्हणून गुरुवारी आणि शुक्रवारी कधीही केस आणि नखे कापू नये.

५) चांगली नोकरी मिळण्यासाठी रोज सकाळी अंघोळीनंतर गुरुचरित्रचा १४ अध्याय वाचवा. आणि एक माळ जप करावा हा उपाय किमान सव्वा महिना करावा याने घरात सुख शांती नांदेल.


Post a Comment (0)
Previous Post Next Post