|| श्री स्वामी
समर्थ ||
दर गुरुवारी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाच तांदळाचे
दाणे टाकायचे. तो तांब्या देवघरात ठेवायचा ठेवल्यानंतर हळद
कुंकू वाहून दिवा अगरबत्ती लावायची हात जोडून प्रार्थना करायची.
हे देवा आमच्या घरातून सर्व दरिद्री नकारात्मकता वाईट शक्ती
सर्व कटकटी नष्ट होऊ दे एवढे बोलून नमस्कार करून आपली
पूजा करायची, आणि तो तांब्या गुरुवारी रात्रभर
तिथेच ठेवायचा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर
अंघोळ करून देवघरात जाऊन देवपूजा करायची. तो तांब्या
तेथून उचलून बाजूला ठेवायचा त्या तांब्यातील पाणी आपल्या
घराच्या बाहेर एका बाजूला कोपऱ्यात किंवा कोणत्यातरी
झाडाला टाकून द्यायचं.