हेल्थ टिप्स
आरोग्यदायी जगण्यासाठी काही सोपे कानमंत्र
शारीरिक हालचाली
प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी वाहन वापरण्याच्या सवयीमुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी होतात. रोजच्या दिनचर्येत सायकल चालवणे अथवा ठराविक अंतर चालणे यासारख्या शारीरिक हालचालींचा आवर्जून समावेश करा.
पुस्तकाची दोन पानं
झोपेपूर्वी दोन तास आधी मोबाईलचा स्क्रीन दूर ठेवा. झोपण्यापूर्वी आवडीच्या
पुस्तकाची दोन पाने चाळण्याची सवय लावून घ्या.
तीन वेळा जेवण- तीन वेळा नाष्टा
थोड्या थोड्या प्रमाणात सकाळ दुपार आणि संध्याकाळी ठराविक वेळेला
नाष्टा आणि जेवण करण्याची सवय लावून घ्या. एकदा किंवा दोनदाच
अधिक प्रमाणात जेवण करणे लाभदायक ठरत नाही.
चार हॉबी ब्रेक
सातत्याने काम करणे व्यक्तीला मानसिकदृष्ट्या थकवते. कामातून दिवसातून थोड्या थोड्या वेळाचा हॉबी ब्रेक चार वेळेस घ्या. या वेळेत आवडणाऱ्या गोष्टी करा.
दोन फळे आणि तीन भाज्या
दिवसातून वेगवेगळ्या वेळांना दोनप्रकारची फळे आणि जेवण-नाष्ट्यामध्ये
तीन भाज्यांचा समावेश करा.
सहा मिनिटांचे ध्यान, झोप आणि पाणी
सूर्योदयाच्या पहिल्याकिरणांच्या साथीने दररोज किमान सहा मिनिटे
मेडिटेशनसाठी राखून ठेवा. दिवसातून कमीत कमी सात ग्लास
पाणी अवश्य प्या. दररोज किमान आठ तासांची झोप अवश्य
घ्या. यामुळे मेंदू आणि शरीर दोन्ही ताजेतवाने आणि सतर्क राहण्यास
मदत होते.