महाभारतात दृष्टीचे ६ प्रकार आहेत.
धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, अर्जुन, कृष्ण, संजय.
धृतराष्ट्र जन्मांधच. त्याशिवाय आतली जी एक नजर असते, त्याच्या नावाने बोंब. संसारात जेव्हा जेव्हा
पश्चाताप करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा एकेकाळी आपण धृतराष्ट्र झालो होतो हे आठवतं.
जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वत:चं मत मांडण्याची वेळ आलेली असताना आपण जाणिवेन दुर्लक्ष करतो, त्यावेळी आपल्यात गांधारीचा संचार झालेला असतो. निर्णय घेता न येणं हि तर अर्जुनासारखी अवस्था. इतरांच्या दुख:कडं आपण तटस्थपणे पाहत राहतो तेव्हा कृष्णाचा साक्षीभाव आपल्याला जवळचा वाटतो, ते आपल्या सोयीसाठी. कृष्णाची तत्व आपल्याला पटली असती तर गोष्ट वेगळी.पण क्वचित प्रसंगी इतरांच्या दुख:ची आपण खिल्लीही उडवतो. संजयच्या दिव्य दृष्टीचा आपल्याशी संबंधच नाही. हाताच्या अंतरावरची गोष्ट आपल्याला दिसत नाही, इतकी आपली दृष्टी दिव्य, मग संजयसारखी दिव्य दृष्टी लाभून काय फायदा? अर्जुनाप्रमाणे गीता संजय आणि धृतराष्ट्र दोघांनी ऐकली पण त्यांच्यात काय फरक पडला? आणि आपल्यांत काय तरी फरक पडणार आहे?
....व. पु . काळे.