तुझे रूप चित्ती राहो / Tuze Roop Chitti Raho With lyrics


विठ्ठल

तुझे रूप चित्ती राहो  / Tuze Roop Chitti Raho With lyrics 

चित्रपट - संत गोराकुंभार.  गीतकार/संगीत - सुधीर फडके 

🙏🙏🙏

|| तुझे रूप चित्ती राहो ||

तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम 

देह प्रापंचाचा दास , सुखे करो काम 

तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम

 तुझे रूप चित्ती राहो..... 


देह धारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म 

सदाचार नीतीहूनी  आगळा ना धर्म 

तुला आठवावे गावे, हाच एक नेम 

देह प्रापंचाचा दास, सुखे करो काम

 तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

  तुझे रूप चित्ती राहो..... 


तुझे नाम पांडुरंग सर्वताप नाशी,

वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी 

दिसू लागलू तू डोळा अरूपी अनाम 

देह प्रापंचाचा दास, सुखे करो काम

 तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम 

 तुझे रूप चित्ती राहो....


तुझ्या पदी वहिला मी देहभाव सारा,

उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा 

नाम तुझे घेतो गोरा, म्हणुनी आठ याम

 देह प्रापंचाचा दास, सुखे करो काम

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम  

तुझे रूप चित्ती राहो....


पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग....

 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग...


तुझे रूप चित्ती राहो  / Tuze Roop Chitti Raho With lyrics 

चित्रपट - संत गोराकुंभार · गीतकार/संगीत - सुधीर फडके 





Post a Comment (0)
Previous Post Next Post