भक्तीगीत - Sudhir Phadke
🙏🙏🙏
स्वये श्री रामप्रभू ऐकती...
श्री राम...
स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती
स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायचे
कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायचे
पुत्र संगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती
कुश लव रामायण गाती....
राजस मुद्रा, वेष मुनींचे, गंधर्वच ते तपोवणीचे
राजस मुद्रा, वेष मुनींचे, गंधर्वच ते तपोवणीचे
वाल्मीकींच्या भाव मनीचे, मानवी रूपे आकारती
कुश लव रामायण गाती....
ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकील
ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकील
बालस्वरांनी करुणी किलबिल, गायनें ऋतुराजा भारिती
कुश लव रामायण गाती....
फुलापरी ते ओठ उमलती, सुगंधसे स्वर भुवनी झुलती
फुलापरी ते ओठ उमलती, सुगंधसे स्वर भुवनी झुलती
कर्ण भूषणें कुंडल डुलती, संगती वीणा झंकारिती
कुश लव रामायण गाती....
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी, नऊ रसांच्या, नऊ स्वर धुनी
यज्ञ मंडपी आल्या उतरुनी, संगमी श्रोतेजन नाहती
कुश लव रामायण गाती....
पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवनपट
पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, प्रभूचे लोचण पणावती
कुश लव रामायण गाती....
सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागून सर्ग चलती
सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागून सर्ग चलती
सचिव, मुनीजन, स्रिया डोलती, आसवे गाली ओघळती
कुश लव रामायण गाती....
सोडूनि आसन उठले राघव, उठून कवळिती आपुले शैशव
सोडूनि आसन उठले राघव, उठून कवळिती आपुले शैशव
पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभयानच माहिती
कुश लव रामायण गाती....
स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती
स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती