संगणकाविषयी ( COMPUTER ) थोडक्यात माहिती मराठी मध्ये

  संगणकाविषयी ( COMPUTER ) थोडक्यात                                 माहिती मराठी मध्ये 

संगणक (Computer) हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन (Electronic Device) असून ते विविध कामांसाठी 

 वापरले जाते. जो माहिती प्रक्रिया (Data Processing) करण्यासाठी वापरला जातो. संगणकात डेटा इनपुट

  (Input) करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना इनपुट उपकरणे म्हणतात. तसेच आउटपुट (Output) 

 द्वारे प्रदर्शित केलेल्या डेटाला आउटपुट उपकरण म्हणतात.



संगणक (Computer) हे विविध कामांसाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. संगणक (Computer) हा

 विविध प्रकारच्या उपकरणांनी बनलेला असतो म्हणजेच अनेक उपकरणे एकत्र करून संगणक तयार केला जातो.

किबोर्ड (Keyboard), मदरबोर्ड (Motherboard),  माऊस (Mouse), सीपीयू (CPU), कॉम्प्युटर डिस्प्ले हे

 सर्व संगणकाचे महत्वाचे भाग आहेत. कंप्युटर म्हणजे असा एक साधन आहे जो डेटा गोळा करून त्यावर प्रक्रिया

 करतो, आणि त्यानुसार परिणाम (Output) दर्शवतो.

कंप्युटरचे प्रकार : डेस्कटॉप कंप्युटर (Desktop Computer)लॅपटॉप (Laptop) टॅब्लेट (Tablet) सुपर कंप्युटर (Super Computer) 

इनपुट डिव्हाइस (Input Devices) : जेव्हा आपल्याला संगणकाला कोणतेही इनपुट द्याचे असते

 तेव्हा त्यासाठी इनपुट उपकरणे वापरली जातात.  इनपुट उपकरणांच्या यादीमध्ये कीबोर्ड,  माऊस, जॉय स्टिक, 

 बरकोड रीडर, लाईट पेन इत्यादींचा वापर केला जातो. 
 
आउटपुट डिव्हाइस (Output Devices): आउटपुट डिवाइस आणि इनपुट डिवाइस या मधील

 फरक हा आहे की इनपुट डिवाइस संगणकाला डेटा  पाठवते तर आउटपुट डिवाइस  सांगणकाकडून डेटा 

 दर्शविण्यासाठी वापरले जाते. उदा. मॉनिटर, प्रिंटर.

सॉफ्टवेअर (Software) : सॉफ्टवेअर हा एक प्रोग्राम असून जो संगणकासाठी खूप महत्त्वाचा आहे.

सॉफ्टवेअर इस्टॉल केलेले नसेल तर त्या संगणकाचा उपयोग नाही कारण संगणकाला काम करण्यासाठी

 सॉफ्टवेअरला सर्वाधिक मागणी असते. सॉफ्टवेअरमध्ये संगणकाच्या कामांशी संबंधित सर्वगोष्टींचा समावेश होतो.


सिस्टम सॉफ्टवेअर (System Software): सिस्टम सॉफ्टवेअरचे कार्य संगणकाचे हार्डवेअर

 व्यवस्थापित करणे, तसेच एप्लीकेशन सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणे आणि त्याला कार्य करण्यास लावणे. 


 एप्लीकेशन सॉफ्टवेअर (Applications Software) :  एप्लीकेशन सॉफ्टवेअर म्हणजे

मायक्रोसॉफ्ट ऑफिस, म्युझिक प्लेयर आहेत. एप्लीकेशन सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला हवे तेव्हा ते कॉम्प्युटर मध्ये

 इन्स्टॉल करू शकता आणि काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हवे तेव्हा ते कॉम्प्युटर मधून बाहेर काढू शकता. 

                   संगणकाचा (Computer) उपयोग 

दैनंदिन वापरात संगणकाचा घरांमध्ये , कार्यालयात , शाळा , बहुराष्ट्रीय कंपन्या,  बँकामध्ये संगणकाचा उपयोग

 केला जातो. संगणकाद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती काढू शकता, तुम्ही ई-मेल पाठवू शकता,  सरकारी

 नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, व्हिडिओ पाहू शकता. तसेच तुम्ही लेखन व दस्तऐवज तयार करू

 शकता, चित्रकला , ग्राफिक्स डिझाईन, माहिती शोधणे (Internet Browsing),व्यवसाय व्यवस्थापन (Business

 Management) इ. उपयोग  करू शकता. 


संगणकाचे प्रकार : आपण वापरत असलेला संगणक हा मायक्रो कॉम्प्युटर आहे. ज्याचे एकूण सहा प्रकार

  आहेत. लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक, होम संगणक,  पामटॉप संगणक, डेस्कटॉप संगणक. कामानुसार

 संगणकाचे पाच प्रकार आहेत. सुपर कम्प्युटर,  ग्रीड कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, मायक्रो कॉम्प्युटर,  मेनफ्रेम

 कम्प्युटर कंप्युटरची मर्यादा विजेवर अवलंबून असते. हॅकिंग व व्हायरसचा धोका होऊ शकतो. तुम्हाला तांत्रिक

 ज्ञान आवश्यक पाहिजे. 

रॅम (RAM) : पूर्ण नाव रँडम एक्सेस मेमरी आहे. जो एक प्रकारचा स्टोरेज आहे. तुमच्याकडे जो डेटा आहे

 तो काही काळासाठी जातन केला जातो आणि तुम्ही तुमचा स्मार्टफोन बंद करतात आणि संगणक बंद करता

 त्यातील डेटा निघून जातो. 

रोम(ROM) : पूर्ण नाव रीड ओन्ली मेमरी आहे . रोम प्रमाणे असलेला डेटा आपोआप जात नाही. तुम्ही

 संगणक बंद केला तरीही रोम मधील डेटा डिलीट होत नाही. 


सीपीयू (CPU) : पूर्ण नाव सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. थोडक्यात त्याला सीपीयू म्हणतात. सीपीयूला

 संगणकाचा मेंदू म्हटले आहे जो संगणकाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आपण संगणकाला कितीही सूचना

 देतो ते पूर्ण करण्याचे काम सीपीयू करते. सीपीयू मुळे संगणकाचे अत्यंत अवघड काम सोपे होते.


संगणकाची भाषा :  संगणकाची भाषा फक्त संगणक समजू  शकते. जेव्हा संगणक एप्लीकेशन तयार

 केला जातो  तेव्हा तयार एप्लीकेशन कामासाठी विविध प्रकारच्या भाषा वापरल्या जातात त्या भाषांना संगणक भाषा

 म्हणतात. 

HHD :  पूर्ण नाव हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे तो संगणकाचा डेटा संग्रहित करते म्हणजे व्हिडिओ, ऑडिओ,

 फोटो, कागदपत्रे हार्ड डिक्स ड्राईव्ह मध्ये सेव केली जातात. तसेच कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलेली विंडोजही हार्ड

 डिक्स  ड्राईव्ह  मध्ये तयार केली जाते. 

माऊस (Mouse) : संगणकाचे इनपुट आहे यात एक ते दोन बटणे आहेत ज्याद्वारे संगणकावर क्लिक केले जाते. 

मदरबोर्ड (Motherboard) : संगणकात तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आढळते. याला

 मेनबोर्ड असेही म्हणतात. 

डीव्हीडी (DVD): पूर्ण नाव डिजिटल व्हिडिओ डिस्क आहे. तुम्ही संगणकावर डीव्हीडी प्ले करू

 शकता. तसेच हा एक प्रकारचा मेमरी आहे त्यामध्ये फोटो, दस्तऐवज, व्हिडिओ सेव केले जातात. 

कीबोर्ड (Keyboard) : संगणकात कोणत्याही प्रकारचा डेटा प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्डचा वापर केला

 जातो. तसेच कीबोर्डचा वापर टायपिंग साठी केला जातो. किबोर्डच्या आत वेगवेगळे बटणे आहे जी वेगवेगळ्या

 प्रकारे वापरली जातात. संगणकासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते.

दैनंदिन जीवनात आपल्याला संगणकाची खूप गरज आहे. संगणकाची थोडक्यात माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post