एक छोटेसे गाव होते. तिथे एक वेडा राहत असे.
त्या वेड्याकडे अशी एक अद्भुत शक्ती होती की जेंव्हा तो नाचत असे, तेंव्हा पाऊस पडत असे.
गावकऱ्यांना पावसाची गरज भासली की तेंव्हा ते वेड्याला नाच करायला सांगत आणि त्याच्या नाचण्याने खरंच पाऊस पडत होता.
एकदा गावात शहरांतील काही मुलं येतात. त्यांना माहीत पडते की ह्या गावात वेड्याच्या नाचण्याने पाऊस पडतो .तेंव्हा त्यांना खुप हसायला येते.
ती मुलं गावकऱ्यांना म्हणतात नाच करून तर आम्ही ही पाऊस पाडू शकतो.म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी एका ठिकाणी गोळा होतात आणि ते मुलं नाचायला सुरुवात करतात.
जवळपास दोन तास नाच केल्यावरही पावसाचे काही चिन्ह दिसत नाही. पण मुलं खुप थकून जातात आणि स्वतःची हार कबूल करतात.
मग गावकरी वेड्याला नाचायला सांगतात आणि वेडा नाचायला लागतो. एक तास, दोन तास आणि हळूहळू संध्याकाळ होते पण वेड्याचे नाचणे काही थांबत नाही.रात्र होता होता पाऊस पडायला सुरुवात होते आणि हे पाहून मूल त्याला विचारतात की तू हे कसे केले.
तेंव्हा तो वेडा म्हणतो मी फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवतो. पहिली ही की माझ्या नाचण्याने पाऊस नक्की पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तोपर्यंत नाचत राहतो जोपर्यत पाऊस पडत नाही.
तात्पर्य:- जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तोपर्यंत काम करत रहा जोपर्यंत यश मिळत नाही. आणि स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी व्हाल.