राज्यात कृत्रिम पावसाची गरज
पावसाळ्याचे ३ महिने कोरडे गेले त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली सर्व पिके वाळून गेले आहेत.
आणि विहिरी पण आटायला लागल्या आहेत. तर अश्या स्थितीत काय करता येईल याचा विचार राज्य
सरकारने केला पाहिजे. आभाळ भरून येतंय आणि निघून जातंय पण पाऊस मात्र पडत नाही तर आशा
वेळेला जर कृत्रिम पाऊस पाडून शेतकर्यांना आणि जनसामान्यांना थोडासा दिलासा मिळत
असेल तर असे करायला काही हरकत नाही.
खर्च :
याबाबतीत बोलायचं झाल तर , इतर मोर्च्या, बैठकी , आणि सभांसाठी जेवढा खर्च होतो नक्कीच
त्यापेक्षा कमीच खर्च लागेल. त्यामुळे या गोष्टीकडे सरकारणे गांभीर्याने पाहावे आणि कृती करावी.
जय हिंद ..