अरे !!! हे बघ ...

 



अरे !!! हे बघ ... काय डेंजर झाल .

अस म्हणून म्हणून आपण पोस्ट पाहतो आणि दुसर्यालाही दाखवतो ..

पण आपल्याला स्थितीच गांभीर्य कळत नाहीये .आपण शेअर केलेल्या पोस्ट मुळे गुन्हेगारांना आणखी प्रोस्ताहन मिळते 

आणि पुढच्या वेळेला आणखी अचूकतेने अपराध होतो . हि गोष्ट समजून घ्या . अपराधी लोकांचे विडीओ पाहून मनोरंजन करणे थांबवा नाहीतर कदाचित पुढच्या वेळेला  वरच्या फोटोमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी असेल. 



हे आणि या सारखे आणखी अनेक  गुन्हेगार  गुन्हे करण्याच्या तयारीत बसलेत  आणि तुमच्या आमच्या सारखे आशा पोस्ट शेअर करून त्यांना मदत करतात . खरच हि गोष्ट प्रसार करण्या सारखी आहे का ? विचार करा . 
आता बहुतेक लोक म्हणतील आशा बातम्या नाही कळाल्या तर आपण सावध कसे होऊ .  आता तर सावध झाले आहात ना एवढ लक्षात ठेवुन जगा . न्यूज वाले तर त्यांचे श्रोते वाढवण्यासाठी काहीही दाखवायला तयार आहेत. पण त्यापेक्षाही जास्त सोशल मिडिया  या गोष्टीना  पसरवत आहे .
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे  जसा गुन्हा होताना चा विडीओ दाखवतात तसाच त्या गुन्हेगाराला काय शिक्षा झाली ती शिक्षा करतानाचा हि विडीओ दाखवला पाहिजे. आणि तो सगळीकडे पसरवला पाहिजे म्हणजे शिक्षा होतानाच्या वेदना पाहून तरी गुन्हेगारी काही अंशात कमी होईल . 
 कृपया अपराधाला प्रोत्साहन देणारे विडीओ शेअर करू नका  हि नम्र विनंती ....
पटत असेल तर बघा. 



Post a Comment (0)
Previous Post Next Post