नातं

                          नातं 

नाते खूप विलक्षण असतात    

कधी हसवतात, कधी रडवतात

कधी दुध भातासारखे मऊ

तर कधी बोचणारे शूल भासतात

     जखमांवर फुंकर घालणारे असतात काही

     आणि तेच, त्यांना ओरबाडनारे असतात

     कधी मायेचा ओलावा

     तर कधी जळजळीत निखारे असतात

अश्रू पुसणारे तेच हात

मदतीचा आधार झिडकारतात     

कधी आनंदाने गलबलून

तर कधी व्देषाने पेटून उठतात

               पावलागणिक उमेद ज्यांची

               त्यांचीच कट्यारे पाठीत निघतात

               जगतांना राग अन मत्सर बाळगणारे

               मरणाला मात्र उपस्थित असतात...   


    
               


2 Comments

  1. खुप छान वर्णन केले आहे पण अजूनही सुंदर झालं असत,पुढच्या वेळेस आणखी छान लिहाल हीच अपेक्षा

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच प्रयत्न करू

      Delete
Post a Comment
Previous Post Next Post