पोटाच्या विविध विकारांवर गुणकारी ओवा
Ø अपचन झाल्यास एक चमचा ओवा चावून खावा, त्यानंतर गरम
पाणी प्यावं, त्यामुळे आराम मिळेल.
Ø कुठल्याही कारणाने पोटदुखी होत असल्यास एक चमचा ओवा,
हळद किंवा सुंठ चूर्ण आणि सैंधव मीठ एकत्र करून चावून
खाल्ल्यानंतर त्यावर थोडं कोमट पाणी प्यायल्याने लवकर आराम
मिळेल.
Ø लहान मुलांच्या पोटात जंत झाले असल्यास उपाशीपोटी ओव्यांचा
पानाचा रस प्यायल्याने जंत निघून जातात.
Ø अनियमित मासिक पाळीचा त्रास असल्यास, ओवा खाऊन त्यावर
गरम पाणी प्यायल्याने त्रास कमी होतो.
Ø ओवा आणि गूळ समप्रमाणात घेऊन दिवसातून दोन वेळा
खाल्ल्याने मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
Ø ओवा,सुंठ चूर्ण आणि जिरं एकत्र करून खाल्ल्यास
acidity पासून आराम मिळेल आणि छातीतील जळजळ कमी
होईल.