जागतिक पर्यावरण दिन विशेष
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत
· पावसाचे पाणी अडवा : कारण प्रत्येक घरात लाखो लिटर पाणी बचत होऊ
शकते. नैसर्गिक वातावरणात जमीन पावसाचे ५०% पाणी शोषून घेते. यामुळे
भूजलाचे पुनर्भरण होते. शहरी भागात जेथे कॉंक्रीटचे बांधकाम केले जाते तेथे
पावसाचे केवळ १५% पाणी जमिनीत मुरते. तसेच ५५% वाहून जाते. शहरी
भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. २०० चौरस
मीटर क्षेत्रफळाचे प्रत्येक घर दरवर्षी सुमारे २ लाख लिटर पाणी जमिनीखाली
पोहोचवू शकते.
फायदा : जल संधारणामुळे जमीन सुपीक होईल, भूजल पातळी वाढेल.
तुमच्या घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा खर्चही कमी असेल.
· झाडे लावा : कारण झाडांजवळील घरे १५% जास्त मौल्यवान असतात.
झाडांची मुळे जमिनीची धूप कमी करतात. झाडे वादळाची शक्ती कमी करतात
आणि पाण्याची गुणवत्तादेखील सुधारतात, नाले आणि नद्यांमधील धूप कमी
करतात. शंभर मोठी झाडे वर्षाला १,००,०० गॅलन पावसाचे पाणी साठवू शकता.
एका विश्लेषणात आढळून आले कि, झाडांजवाळील घरांची किंमत तुलनेने ९ ते
१५ टक्के जास्त असते.
फायदा : झाडे निरोगीही ठेवतात. एका संशोधनानुसार,
रुग्णालयांजवळ झाडे आहेत. तिथे रुग्ण लवकर बरे होतात.
· प्लास्टिकचा वापर कमी करावा : कारण यामुळे समुद्री जीव वाचवता येतील.
सरासरी प्रत्येक व्यक्ती दरवर्षी एकल-वापर प्लास्टिकचे ४६६ तुकडे वापरते.
साध्या समुद्रात ७५ ते १९९ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा आहे. यामुळे सागरी
जीव मरत आहेत. २०४० पर्यंत दरवर्षी २३३ ते ३७ दशलक्ष टन प्लास्टिक
कचरा निर्माण होईल. भारतात दरवर्षी ९६.६ लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण
होतो, यापैकी ४३% एकल-वापर
प्लास्टिक आहे.
फायदा : मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरातही पोहचले आहे. ते
विषारी ठरू शकते. म्हणून प्लास्टिक बंद करा.