स्वयंपाक घरातील उपयुक्त टिप्स
स्वयंपाक करताना खुपदा घाईगडबडीने काम केले जाते. कधी अंदाज चुकतो. एखादी गोष्ट बिघडते अश्यावेळी त्या वस्तूचा सदुपयोग करून नवीन काही बनवता येते.
·
दुध नासणार असे वाटले तर गरम दुधात
सायट्रिक acid वा लिंबूरस किंचित पाण्यात
घालून त्यात दुध पूर्ण नासवावे. पातळ
कपड्यात बांधून घट्ट करावे. हे पनीर भाजी,
कटलेट, पराठा इत्यादी. वापरता येते.
· गुलाबजाम काही कारणाने जमत नाहीत.
तळणीत टाकताच फुटू लागते तर पुढे
प्रयोग न करता त्यात खवा आणि भाजलेला रवा
घालावा व पिठीसाखर घालून लाडू वळावे.
·
इडलीचे पीठ जरा आंबट जास्त वाटले
तर त्यात थोडी कणिक, मैदा व डाळीचे
पीठ घालून तिखट मीठ किंवा पिठीसाखर,
घालून गोड किंवा तिखट धिरडी बनवावी.