जीवन जगण्याची कला म्हणजे शिक्षण...

 

येथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. 

ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रुपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. 

येथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. 

शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही.

माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवती पसरला आहे. परंतू ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण आसुसलेले आहोत. 

शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी.

धन्यवाद.....


Post a Comment (0)
Previous Post Next Post