श्रीमंती....

 श्रीमंती....

एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते..

सर्व भारी भारी साड्यांची खरेदी

झाल्यावर दुकानदाराला म्हणते,

मला एक स्वस्तातली साडी द्या.

मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे.

बाई साड्या घेऊन निघून जाते...

थोड्या वेळाने दुकानात एक गरीब बाई येते..

ती दुकानदाराला म्हणते, मला एक एकदम भारी साडी द्या.

मला माझ्या मालकिणीला द्यायची आहे,

तिच्या मुलाच्या लग्नात...!!

खर सांगा “श्रीमंत” कोण ?


Post a Comment (0)
Previous Post Next Post