श्री सत्यनारायण पूजा विधी

 

श्री सत्यनारायण पूजा विधी कशी करावी?

सत्यनारायण पूजा कशी करावी व त्यासाठी लागणारे साहित्य पूजा मांडणी कशी करावी संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे :


साहित्य : 

१) सत्यनारायणाचा फोटो – १, 

२) बाळकृष्णाची मूर्ती – १,

३) तांब्याचे कलश –२,

४) ताम्हण (तांब्याचे) – १,

५) सुपारी – ३,

६) विडयाची पाने – १५, 

७) नारळ - १,

८) तांदूळ – पाव किलो, 

९) आंब्याचे डघळे – ४, 

१०) चौरंग – १,

११) गहू – अर्धा किलो, 

१२) हळद, १३) कुंकू, 

१४) अष्टगंध,

१५) अगरबत्ती, 

१६) कपूर,

१७) दिवा, 

१८) फुले, 

१९) पांढरा कपडा – १,

प्रसादासाठी – शिरा,  नैवेद्य – अन्नाचा.

पूजेची मांडणी :

एक चौरंग, एक पाट, चौरंगाभोवती आंब्यांची चार डगळे लावावीत. चौरंगावर शुभ्र वस्र

 टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे. त्यावर एक कलश, त्यात पाणी भरून ठेवावा.

 त्यात पाच विडयाची पाने ठेवावीत. त्यावर ताम्हण (तांब्याचे ताट) तांदुळाणे पूर्ण भरून

 त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगावरती तीन सुपाऱ्या विडयाचे जोड

 पानावर मांडाव्यात. (पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरुण देवतेची)

 याप्रमाणे मांडामांड करून सर्वांची पुढील प्रमाणे पूजा करावी.  

Post a Comment (0)
Previous Post Next Post