पसायदान

 पसायदान 

sant dnyaneshwar maharaj

आतां विश्वात्मकें देवें | येणें वाग् यज्ञें तोषावें |

तोषोनी मज द्यावें | पसायदान हें || १ ||

जे खळाची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो |

भुतां परस्परें  पडो |  मैत्र जिवांचे || २ ||

दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सुर्ये पाहो |

जो जें वांछिल तो तें लाहो | प्राणीजात || ३ ||

वर्षत सकळमंगळी | ईश्वर निष्ठानची मांदियाळी |

अनवरत भूमंडळी | भेटतु भूतां || ४ ||

चला कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणीचे गांव |

बोलते जे अर्णव | पियूषाचे || ५ ||

चंद्रमे जे अलांछन | मार्तंण्ड जे तापहीन |

ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे हो तु || ६ || 

किंबहुना सर्वसुखीं | पूर्ण होवोनी तिहीं लोकीं | 

भजिजो आदिपुरुखीं | अखंडित || ७ ||

आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकीं इयें | 

दृष्टयदृष्टविजयें | हो आवें जी || ८ ||

येथे म्हणे श्री विश्वेशरावो | हा होईल दान पसावो |

येणे वरें ज्ञानदेवो | सुखिया झाला || ९ || 

पसायदान ही केवळ प्रार्थना नाही तर समाजासाठी आदर्श आणि उदात्त संकल्पना आहे.

 यातील विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचे हे पसायदान

 शतकानुशतके लोकांच्या मनामनात प्रेरणा देत राहील!

Post a Comment (0)
Previous Post Next Post