माझे आवडते पुस्तक "श्यामची आई"

          माझे आवडते पुस्तक  "श्यामची आई"


SHYAMCHI AAI

 Also read : शालेय विद्यार्थ्यांसाठी 10 उत्तम निबंध 

"श्यामची आई" या पुस्तकाला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहे. श्यामची ही

 साने गुरुजींची आत्मकथन आहे. साने गुरुजींनी त्यांच्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवाची शिदोरी या पुस्तकाच्या

 माध्यमातून मांडली, तसेच या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम, भक्ति,आणि कृतज्ञता मांडली आहे.

 स्वातंत्र्य युद्धातील साने गुरुजींच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 9 फेब्रुवारी 1933 रोजी

 नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. साने गुरुजी यांनी आपले

 बरेच लेखन तुरुंगात असताना केले. श्यामची आई हा कथासंग्रह त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपवली.

 श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी ममतेचा महिमा गायला आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बालबोध

 घराण्यातील सध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रणही यात केले. साने गुरुजी साठी त्यांची आई गुरु आणि कल्पतरू

 होती. गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडांवर प्रेम करायला तिने त्यांना शिकवले.श्यामचे बालपण गरीब पण

 संस्कारक्षम कुटुंबात घडते. श्यामच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिति अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले

 नसल्याने त्यांना रोजगार योग्य मिळत नाही. या परिस्थितित श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते. ती

 कष्टाळू, संयमी आणि त्यागशील स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दु:ख आणि त्रास सहन करूनही आपल्या

 मुलांना चांगले संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक केवळ आईच्या ममतेचीगोष्ट नाही तर  तिच्या नैतिकता,

 समाजसेवा आणि कर्तव्य पालनाचेही उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्व शिकवते

 आणि त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्याला सत्य, अहिंसा, आणि प्रामाणिकपणाचे धडे

 दिले. ती श्यामला नेहमी इतरांची मदत करण्यास प्रेरित करते. श्यामची आई नेहमी देवावर श्रद्धा ठेवून कष्ट आणि

 त्यागाची शिकवण देते. पुस्तकात अनेक प्रसंगामध्ये आईच्या कर्तुत्वचा उल्लेख आहे. श्यामला शाळेत

 पाठवण्यासाठी ती कष्टाने पैसे साठवते.  आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला चांगली

 माहिती होती. आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकात

 केले आहे. गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वर भक्तीची भावना त्यांच्यात व त्यांच्या भावंडात

 निर्माण केले. या संस्कारामुळे  चंद्र सूर्यासारखी तेजस्वी फुले साने गुरुजीच्या रूपाने उमलली. श्यामची आई

 पुस्तकातील एक-एक शब्द स्फूर्तिमय आहे. तो मनाला उभारी देऊन जातो. साने गुरुजींचा श्याम आणि त्यांची आई

 हे घराघरात आदर्श मानले जातात. आज जरी श्यामची मधील श्याम पडद्याआड  गेला असेल तरी या पुस्तकाला

 वाचून नवीन श्याम तयार होत आहे. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आपल्या आयुष्यात एकदा तरी श्यामची आई पुस्तक

 वाचा. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post