नवऱ्या साठी मराठी कविता
नवरा म्हणजे समुद्राचाभरभक्कम काठ
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ llकितीही येवो प्रपंच्यात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा llसर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो llकधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन
मशाली सारखं जळत असतं llनवरा आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही llबायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते
दुःख समजून न घेण्याची
अनेक बायकात उणीव असते llसारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात llसगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो llइकडे आड तिकडे विहीर
तशीच बायको आणि आई
वाट्टेल तसा त्रास देतात
कुणालाच माया येत नाही ll