प्राचीन भारत
इतिहासकारक असं मानतात की चंद्रगुप्त मौर्य हा खऱ्या अर्थाने भारताचा पहिला सम्राट होता. धनानंदाचा पराभव करत, नंद साम्राज्य संपवत हा राजा झाला. आर्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्याचे साम्राज्य वाढवले. उत्तरेकडे इराणची सीमा, पूर्वेकडे बंगालपर्यंत आणि दक्षिणेत दख्खनच्या पठरापर्यंत त्याचे राज्य पसरले होते. याचे सैन्यदल प्रचंड मोठे होते. त्याचे गुप्तहेर खाते एकदम प्रभावी होते. केंद्र आणि राज्य सरकार अशी त्याच्या राज्याची पद्धत होती. ग्रीक साहित्याप्रमाणे अलेक्झांडर आणि चंद्रगुप्त याची भेट झाली होती.