अशीच एक सुंदर कथा

 

अशीच एक सुंदर कथा

एके दिवशी चिमणीने मधमाशीला विचारले, “तू इतक्या मेहनतीने मध

 बनवतेस,माणसे तो तुझ्यापासून हिसकावून घेतात. तुला वाईट वाटत नाही

 का?” मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, “माणसे फक्त मी

 बनवलेला मधच घेऊन जातात. मध बनवण्याची कला नाही घेऊन जावू

 शकत.....” या जगात कोणीही तुमची नक्कल करू शकतो; पण तुमचे 

‘टँलेंट’ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी,

 कार्यशील रहा व आपल्या क्षेत्रात दमदार कामगिरी करत रहा.

 



 

जीवनरूपी नौका

एकदा एकजण स्वत:हून गोकुळात जायला निघाला. त्याला नावेत बसून

 यमुना नदी पार करायची होती. पण भांगेच्या नशेत होता. तो नावेत बसला

 व वल्ही मारू लागला. संपूर्ण रात्र तो नाव चालवत राहिला. हळूहळू सकाळ

 झाली. तो नावेतून मग खाली उतरला. एकाला म्हणाला, “हे मथुरेसारखेच

 दुसरे कोणते गाव दिसत आहे.” ती व्यक्ती म्हणाली, “हि मथुराच आहे.”

 मग त्याच्या लक्षात आले, की त्याने नावेचा दोरखंड  सोडलाच नव्हता.

 नशेत असल्यामुळे तो दोरखंड सोडायचा विसरला होता. सर्व रात्र वल्ही

 मारूनही तो तिथेच होता.

तात्पर्य : आपणही जीवननौकेतून प्रवास करताना जर वासनारूपी दोर सोडला

 नाही, तर भगवंतापर्यंत पोहचू शकणार नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post