सकारात्मक विचार

 

     दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा.

सकाळची सुरुवात काही तरी सकारात्मक वाचनाने अगर श्रवणाने करा. 

रात्रीची झोप झाल्यानंतर आपण तणावरहित असतो आणि आपले सुप्त मन ग्रहणक्षम असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे होते आणि प्रत्येक दिवस सकारात्मक बनविण्याची मानसिकता आपल्या ठिकाणी निर्माण होते. स्वतःमध्ये बदल घडून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सकरात्मक विचार आणि वर्तन  आयुष्याचा अविभाज्य भाग बनविण्याचा निर्धार करावा लागतो. सकारात्मक विचार व सकारात्मक वर्तन अंगवळणी पडेपर्यंत सतत प्रयत्न करत राहा.

प्राध्यापक विल्यम जेम्स एकदा म्हणाले होते, “जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम धडाडीने करा.”

Post a Comment (0)
Previous Post Next Post