आनंदाचे रहस्य

 

|| कुटुंब ||



कुटुंब म्हणजे अशा सुंदर स्वप्नाचा समूह, ज्यांच्यासोबत आपण 

आयुष्याचा प्रवास सुरु करतो. संधीची दारे उघडणारी आपली 

ओळख. आपल्याला सर्वोत्तम योगदान देण्याची प्रेरणा ताकद. 

आपल्याला बाहेर पडण्यास सक्षम करणारी प्रेरणा आणि कधीही आपली 

साथ न सोडणारी आपली सावली. कुटुंब हेच आपल्याला पूर्ण शांतता 

मिळवून देणारे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.

आनंदाचे रहस्य

·       पहिले प्राधान्य प्रेम

कुटुंब हे सर्वात कुटुंबातील सदस्याचे प्राधान्य असते. 

करिअर,शिक्षण किंवा सामाजिक जीवन आशा जीवनाच्या                प्रत्येक क्षेत्रात यशासाठी कुटुंबाची साथ आवश्यक असते,

हे त्यांना माहित आहे.

·       दुसरी गरज म्हणजे संस्कार

या घरातील कुटुंबीय आपापसात आपला स्नेह उघडपणे व्यक्त 

करतात. सुख आणि दु:ख दोन्ही वाटून घ्यायचे हे या 

कुटुंबाच्या संस्कारात समाविष्ट आहे. कारण सशक्त कुटुंबाचा 

आधार शेअरिंग हा आहे.

·       तिसरे महत्त्व आदराला

सर्वात आनंदी कुटुंबात नेहमीच आदर व सकारात्मकता असते. 

एकमेकांचे पूर्णपणे ऐकणे खूप महत्त्वाचे आहे ही कल्पना या 

कुटुंबामध्ये खोलवर रुजलेली आहे.

·       चौथी आवश्यकता वेळ

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कुटुंबे खूप वेळ एकत्र घालवतात. 

क्वालिटी टीमचे महत्त्व या कुटुंबाला माहित आहे, त्यामुळे एकत्र

 फिरायला जाणे हे या कुटुंबाचे नियमित काम असते. 

परंपरा पाळा नव्या पिढीची मुळे रुजतील

कौटुंबिक परंपरेशी संबंधित छोटेही काम पूर्ण प्रेम, समर्पण आणि 

सतर्कतेने करा. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी व समस्या हाताळाल

 तेव्हा मोठ्या गोष्टी सहज होतात. तुम्ही कुटुंबात जुन्या परंपरा जपता 

आणि नव्यांचा पाया घालता, तेव्हा त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत जातात

 आणि आशा प्रकारे तुम्ही व तुमचे पूर्वज कायम कुटुंबासोबत राहतात. 

परंपरा कौटुंबिक घट्ट नात्याची देणगी देतात.

एकत्र खेळा कुटुंबात आनंद, जवळीक वाढेल

ज्या कुटुंबात सर्व जण एकत्र खेळतात ते एकत्र राहतात. आठवड्यातून 

एकदा चित्रपट पहा, घरातील काही काम एकत्र पूर्ण करा आणि 

मोठ्याने हसा. तुमच्या मुलांना एकत्र आनंदी राहण्याचे आणि एकत्र

 काम करण्याचे महत्त्व शिकवा. हसणे हा लोकांमधील अंतर कमी 

करण्याचा सर्वात वेगवान आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा 

सर्वात शहाणा मार्ग आहे. 

कारण तुमचं यश तुमचं कुटुंब आणि मुल किती सक्षम होतात 

याच्या आधारावर बघितलं जाईल, तुम्ही काय कमावलं यावर नाही. 

प्रेम व्यक्त करा कारण मुलं तुमाच्याद्वारे शिकतात.

कुटुंबीय किंवा कुटुंबप्रमुख या नात्याने दुसरी पायरी म्हणजे विश्वास

 निर्माण करणे व कौटुंबिक नियमांचे पालन करून घेणे. कुटुंबात 

आपण त्यांना कधीच सांगत नाही की, आपण त्यांच्यावर किती प्रेम 

करतो. तुम्ही आनंदी असल तर कुटुंब आनंदी होईल. तुम्ही शांत 

राहिल्यावर इतरांनाही चांगले वाटेल. तुम्ही आणि कुटुंब सर्वोत्तम

 प्रयत्न कराल तेव्हा दोघांचीही प्रगती होईल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post